08 August 2020

News Flash

बँक ऑफ महाराष्ट्र ‘मोबाइल बँकिंग’ प्रांगणात

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ महाराष्ट्रने ‘महामोबाइल’ या नावाने मोबाइल अ‍ॅप नुकतेच सादर केले.

| January 30, 2015 03:51 am

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ महाराष्ट्रने ‘महामोबाइल’ या नावाने मोबाइल अ‍ॅप नुकतेच सादर केले. यातून बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या ठेवी, कर्ज खाते, निधी हस्तांतरण, वेगवेगळ्या देयकांचा भरणा आणि अन्य प्रकारच्या सेवांसाठी बँकेला करावयाची विनंती आपल्या मोबाइल फोनचा वापर करून करता येईल.
या निमित्ताने झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. मुनोत, कार्यकारी संचालक आर. आत्माराम आणि आर. के. गुप्ता उपस्थित होते. बँकिंग व्यवहार हे सर्वासाठी सहजसोपे व्हावेत अशा प्रयत्नांतूनच हे नवीन मोबाइल अ‍ॅप आपण बँकेच्या १.८ कोटी ग्राहकांना अर्पण केले आहे, असे मुनोत यांनी याप्रसंगी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2015 3:51 am

Web Title: bank of maharashtra mobile banking
Next Stories
1 ‘पेमेन्ट बँके’साठी एअरटेल उत्सुक!
2 २००० कोटींच्या ‘पॅकेज’ची ठेवीदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
3 स्टेट बँक ऑफ हैदराबाद ४०० कोटी उभारणार
Just Now!
X