सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या चर्चेत बँक व्यवस्थापनाने आणखी अवधी लागणार असल्याचे नमूद केले. तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय योजना, पाच दिवसांचा आठवडा, कामाचे तास, निवृत्तिवेतन आदी मागण्यांसाठी उपसमिती नियुक्त करण्याचा निर्णय झाला. चर्चा सुरू असल्यामुळे बँक कर्मचारी संघटनेने बुधवारचा एक दिवसाचा संप रद्द केला होता. तर २१ ते २४ दरम्यानच्या संपाची हाक कायम आहे.