03 June 2020

News Flash

बँकांचा व्याजदर कपातीचा धडाका

पतधोरणानंतर लगेचच सर्वप्रथम दर कपात करणाऱ्या स्टेट बँकेनंतर बुधवारी अनेक बँकांनी त्यांचे ऋण दर (बेस रेट) कमी केल्याची घोषणा केली

रेपो दराच्या रूपात रिझव्‍‌र्ह बँकेकडून उपलब्ध होणाऱ्या निधीवरील व्याज अध्र्या टक्क्यापर्यंत कमी झाल्याचा लाभ व्यापारी बँका त्यांच्या कर्जदारांना मिळवून देण्यात आघाडी घेत आहेत. पतधोरणानंतर लगेचच सर्वप्रथम दर कपात करणाऱ्या स्टेट बँकेनंतर बुधवारी अनेक बँकांनी त्यांचे ऋण दर (बेस रेट) कमी केल्याची घोषणा केली. निश्चित ऋण दरापेक्षा कमी दराने बँकांना कर्ज दर आकारता येत नाही.
जानेवारी २०१५ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने पाऊण टक्के रेपो दरात कपात करूनही व्यापारी बँकांनी मात्र केवळ ०.३० टक्के स्वस्ताईच कर्जदारांना देऊ केली होती. याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ऋण दराबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्याचे सूतोवाच करणाऱ्या गव्हर्नरांच्या भूमिकेनंतर यंदा मात्र बँकांनी कपातीसाठी आघाडी घेतली आहे. बुधवारी खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेने तिचा ऋण दर ०.३५ टक्क्याने कमी करत तो ९.५० टक्क्यांवर आणून ठेवला. यापूर्वी हा दर ९.८५ टक्के होता. नव्या फेरबदलाची अंमलबजावणी बँक ५ ऑक्टोबरपासून करणार आहे.
बँकेची ही तिसरी दर कपात आहे. बँकेने यापूर्वी एप्रिल (०.२०%) व जून (०.१०%) मध्ये दर कमी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2015 7:30 am

Web Title: banks lower down their interest rates after rbi policy
Next Stories
1 अश्विनी कुमार ‘आयबीए’चे नवे अध्यक्ष
2 भारतातील परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला; अमेरिका आणि चीनला टाकले मागे
3 रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदरात कपात
Just Now!
X