05 June 2020

News Flash

बँक समभागांना ‘मूल्य’बळ

सत्राच्या सुरुवातीला भली मोठी आपटी अनुभवणाऱ्या शेअर बाजाराने रिझव्‍‌र्ह बँकेच्या अनपेक्षित भरघोस दर कपातीचे अखेर स्वागतच केले

सत्राच्या सुरुवातीला भली मोठी आपटी अनुभवणाऱ्या शेअर बाजाराने रिझव्‍‌र्ह बँकेच्या अनपेक्षित भरघोस दर कपातीचे अखेर स्वागतच केले. सत्रात ३०० अंशांपर्यंत आपटणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर १६१.८२ अंश वाढीसह २५,७७८.६६ वर पोहोचला तर ४७.६० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला त्याचा ७,८०० चा टप्पा पुन्हा गाठता आला. निफ्टी दिवसअखेर ७,८४३.३० वर बंद झाला.
रिझव्‍‌र्ह बँकेचे चौथे द्वैमासिक पतधोरण गव्हर्नर डॉ. रघुराम राजन सादर करण्यापूर्वी मुंबई निर्देशांक तब्बल ३०० अंशापर्यंत खाली आला होता. मात्र थेट अध्र्या टक्क्याच्या रेपो दर कपातीने बाजार सावरला. व्याजदराशी निगडित समभागांसह बँक निर्देशांकाने तेजी नोंदविली. आंतराष्ट्रीय बाजारात संमिश्र वातावरण असताना येथे मात्र वाढीचे वातावरण राहिले.
रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक प्रमाण मर्यादा शिथिल करण्याचे धोरण बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढविण्यास कारणीभूत ठरले. तर जवळपास अर्धशतकी निर्देशांक वाढीने निफ्टीला त्याचा ७,८०० वरील स्तर पुन्हा गाठता आला. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेची वाढती महागाईबाबतची चिंता आणि घसरत्या विकास दराच्या अंदाजामुळे बाजाराला दिवसअखेर मोठी मजल मारता आली नाही. परिणामी मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅपमध्येही संमिश्र हालचाल नोंदली गेली.
व्याजदर संलग्न समभागांचे भाव वधारले
रिझव्‍‌र्ह बँकेने अनपेक्षितपणे थेट अध्र्या टक्का दर कपात केल्याने व्याजदर आणि कर्ज क्षेत्राशी निगडित शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मंगळवारी दुहेरी आकडय़ापर्यंत उंचावले. स्थावर मालमत्ता, वाहन उत्पादक कंपन्यांबरोबर ग्राहकपयोगी वस्तू गृह वित्त कंपन्या तसेच बँक समभागांचे मूल्य वाढले.

स्थावर मालमत्ता :
एचडीआयएल रु. ७२.६० (+९.८३%)
इंडियाबुल्स रिअल इस्टेट रु. ६४.२५ (+४.३०%)
डीएलएफ रु. १३४.६५ (+४.१८%)
शोभा लि. रु. २७३.२५ (+३.९४%)
डीबी रिएल्टी रु. ५८.५५ (+३.४५%)

बँक :
इंडसइंड बँक रु. ९४१.४० (+२.२९%)
बँक ऑफ बडोदा रु. १८६.९० (+१.६६%)
एचडीएफसी बँक रु. १,०६४.४० (+१.७२%)
येस बँक रु. ७३८.२५ (+१.१६%)
स्टेट बँक रु. २४२.०० (+१.०२%)

वाहन :
मारुती सुझुकी रु. ४,६७४.७५ (+३.१२%)
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र रु. १,२५१.७५ (+२.४८%)
एमआरएफ रु. ४१,८०८.०० (+१.६६%)
टाटा मोटर्स रु. २८८.६५ (+१.१९%)
आयशर मोटर्स रु. १७,४६८.६० (+०.९८%)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2015 8:03 am

Web Title: banks stocks get stronger
Next Stories
1 राज्याच्या ई-कारभाराला मायक्रोसॉफ्टच्या ‘क्लाऊड’ सेवांचे बळ
2 रेपो दरात अर्धा टक्क्याची कपात, कर्जदारांना दिलासा
3 यंदा व्याजदर कपात निश्चित; रिझव्‍‌र्ह बँकेचे आज पतधोरण
Just Now!
X