देशस्तरावर सराफ व्यवसायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेच्या रूपाने सुरू असलेल्या प्रयत्नांचाच भाग म्हणून ‘बॉम्बे बुलियन असोसिएशन (बीबीए)’ या सराफांच्या जुन्या संघटनेने कात टाकत ‘इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन लि.’ असे नवे नामाभिधान धारण केले आहे.
बीबीएच्या डिसेंबरमध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत संघटनेच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात आली होती. त्यानुसार निश्चित केलेल्या नव्या नावाला संघटनेच्या सर्व संचालकांनी मान्यता दिली. देशस्तरावर विस्ताराबरोबरच इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या संचालक मंडळात देशस्तरावरून प्रतिनिधित्व देण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे, असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी सांगितले. २२ जणांच्या संचालक मंडळात रिझव्‍‌र्ह बँकेचे दोन प्रतिनिधी, तर उर्वरित २० जणांमध्ये देशाच्या उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व विभागातून प्रत्येकी एक जण संचालक म्हणून निवडला जाईल. तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्य विभागातून सर्वाधिक १६ संचालक असतील, असे कम्बोज यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागातून नवी सदस्यांची नोंदणी, सराफ संघटनांचे सम्मीलनासाठी अर्ज मागविण्यात आले असून, या अर्जाची छाननी करून निर्णय घेण्यासाठी सहा सदस्यांची समितीही बनविण्यात आल्याचे कम्बोज यांनी स्पष्ट केले.

Israeli missiles hit site in Iran
Iran-Israel War : इस्रायलची इराणविरोधात कारवाई सुरू, न्यूक्लीअर साईट्स असलेल्या शहरात अनेक स्फोट
d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
Jijau Vikas Party Announces Candidates for Bhiwandi and Palghar Lok Sabha Seats
जिजाऊ विकास पार्टी भिवंडी व पालघर लोकसभा लढवणार
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन