सुरक्षितता, कौशल्य विकास, तंत्रज्ञानाचा अवलंब याची कास धरत बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदारांची राष्ट्रीय संघटना ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या जलशाचे मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात येत्या ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन केले आहे. जागतिक स्तरावर आयोजित होणाऱ्या ‘बौमा कॉनएक्स्पो शो’ची भारतीय आवृत्ती म्हणजे ‘बीसी इंडिया २०१३’मध्ये देशातील बांधकाम यंत्रसामग्री, इमारत निर्माण मशिनरी, खाणकाम मशिनरी आणि बांधकामास उपयुक्त वाहने आदींचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. तब्बल दीड लाख चौरस फूटाच्या प्रदर्शन क्षेत्रात जेसीबी, ह्युंदाई, केस, मित्सुबिशी हेवी व्हेइकल्स, सिफा, शांटुई अशा विदेशी कंपन्यांसह एकूण ७०० प्रदर्शक सहभागी होत आहेत, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष महेश मुद्दा यांनी दिली. या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बौमा कॉनएक्स्पोचे मुख्याधिकारी थॉमस लॉफलर हेही उपस्थित होते. प्रदर्शना निमित्ताने सध्या वापरात असलेल्या अत्याधुकि व वेगाने बदलत असलेल्या तंत्र व तंत्रज्ञानाची देशातील बांधकाम व्यावसायिकांना ओळख होणार आहे.