करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणामुळे जगभरातील हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. करोनामुळे विकासाच्या प्रगतीला खिळ बसली. दरम्यान प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांच्या ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. बिल गेट्स यांनी या अहवालाच्या माध्यमातून करोनामुळे झालेलं आर्थिक नुकसान आणि त्यावर मात करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ने वर्षातील चौथा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार आर्थिक प्रगतीचा वेग असाच राहीला तर २०२१ च्या अखेरपर्यंत जागतिक अर्थव्यस्थेमध्ये सुमारे १२ ट्रिलियन डॉलर्स किंवा त्याहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या नुकसानापेक्षा हे अधिक असेल. दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगभरातील अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी आतापर्यंत सुमारे १८ ट्रिलियन डॉलर खर्च केले आहेत. अशा आशयाचा हा संपूर्ण अहवाल आहे.

या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संपूर्ण अहवाल पाहू शकता

https://www.gatesfoundation.org/goalkeepers/report/2020-report/#GlobalPerspective

http://gatesfoundation.isebox.net/goalkeepers/goalkeepers-report-2020 

https://www.youtube.com/watch?v=3cdASyf16L8&ab_channel=GatesFoundation

करोनाचा कहर सुरूच; रुग्णांची संख्या ४८ लाखांच्या पुढे

भारतात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात करोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे. महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात असून एकूण मृत्यूपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील करोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी करोनावर मात केली आहे.