07 July 2020

News Flash

बीएनपी परिबा‘सर्वोत्तम मालमत्ता व्यवस्थापन कंपनी’

आशियातील वित्तीय उद्योगाचा मागोवा घेणारे द अ‍ॅसेट हे एक ख्यातकीर्त नियतकालिक आहे.

एक प्रमुख म्युच्युअल फंड घराणे असलेल्या बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाला, हाँगकाँगस्थित द अ‍ॅसेट मॅगेझीन या नियतकालिकाने ७ जून २०१६ रोजी झालेल्या ‘द अ‍ॅसेट ट्रिपल ए इन्व्हेस्टमेंट अवार्ड २०१६’ या पुरस्कार सोहळ्यात ‘वर्षांतील सर्वोत्तम मालमत्ता व्यवस्थापन कंपनी’ असा बहुमान बहाल करण्यात आला.
आशियातील वित्तीय उद्योगाचा मागोवा घेणारे द अ‍ॅसेट हे एक ख्यातकीर्त नियतकालिक आहे. भारतीय वित्तीय बाजारपेठेच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना या पुरस्काराद्वारे गौरवान्वित करण्यात येते. बीएनपी परिबाने गुंतवणूकदारांसाठी विविधांगी योजनांच्या प्रस्तुती करून, डिसेंबर २०१५ अखेर समाप्त वर्षांत केलेल्या सर्वागीण कामगिरीची हा पुरस्कार म्हणजे पावती आहे.
या कालावधीत बीएनपी परिबाच्या एकूण गंगाजळीत (एयूएम) १२०० कोटींची भर पडली आहे. जी आधीच्या वर्षांच्या तुलनेत ३०.९ टक्क्य़ांची भरीव वाढ दर्शविते. निधी व्यवस्थापक पुनीत पाल यांच्याकडून हाताळला जात असलेला बीएनपी परिबा गव्हर्न्मेंट सिक्युरिटीज फंड (ग्रोथ) हा त्या वर्गातील अन्य फंडाच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी करणारा ठरला  आहे. बीएनपी परिबा गव्हर्न्मेंट सिक्युरिटीज फंडाची एकूण मालमत्ता वर्षभराच्या अवधीत विक्रमी ६३२ कोटींनी म्हणजेच ११२.९२ टक्क्य़ांनी वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 7:42 am

Web Title: bnp paribas is best asset management company
Next Stories
1 सुवर्ण रोखे व्यवहार सोमवारपासून ‘एनएसई’वर खुले!
2 आगामी दूरसंचार ध्वनिलहरी लिलावात वापर शुल्क ३ टक्क्य़ांवर
3 बाजार निर्देशांकांची दौड सुरूच!
Just Now!
X