येत्या महिन्याच्या सुरुवातील येऊ घातलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात किमान आणखी पाव टक्क्य़ाची तरी दर कपात आहे, असे भाष्य बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने केले आहे. अमेरिकास्थित बँकेने, मान्सून यंदा कायम राहण्याच्या शक्यतेने महागाई वाढण्याची चिन्हे नाहीत, असा दुजोरा कपातीसाठी दिला आहे. जूनमधील किरकोळ महागाई दर ५.२ टक्के राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. अन्नधान्याच्या किंमती वाढू नयेत यासाठी सरकारच्याही उपाययोजना परिणामकारक ठरत असल्याचेही बँकेने म्हटले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण ४ ऑगस्ट रोजी जाहीर होत आहे. मध्यवर्ती बँकेने २०१५ मध्ये आतापर्यंत तीन वेळा दर कपात केली आहे. गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी प्रत्येकवेळी पाव टक्क्य़ाची दर कपात केली आहे.
ग्रीसमधील घडामोडींवर, बँकेने म्हटले आहे की, ही समस्या लगेचच संपुष्टात येऊन अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हकडून येत्या महिन्यात घेतले जाणाऱ्या निर्णयाचाही फार परिणाम होणार नाही.
भारतीय समभागांना फटका
ग्रीसमधील घडामोडींनी भारतीय भांडवली बाजारातील संबंधित कंपन्यांचे समभाग सोमवारी खालावले.
या कंपन्यांचे व्यवसायानिमित्त युरोपात अस्तित्व आहे. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रातील कॉक्स अ‍ॅन्ड किंग्सचा समभागही ५.६१ टक्क्य़ांनी घसरला. तर थॉमस कूकही ३.८४ टक्क्य़ांनी खाली आला.

भारत फोर्ज : -४.०३%
टाटा मोटर्स : -२.०७%
हॅवल्स इंडिया : – १.६६%
मदरसन सुमी : -१.३२%
टाटा स्टील : -०.७९%

आयटी परिणाम :
एचसीएल टेक : -२.७८%
इन्फोसिस : -१.५८%
विप्रो : -१.२३%