News Flash

शेअर बाजार गडगडला; निर्देशांकात ५५० अंकांची घसरण

दिग्गज कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण

शेअर बाजार गडगडला; निर्देशांकात ५५० अंकांची घसरण
संग्रहित छायाचित्र

गुरूवारी सकाळी मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३८६.२४ अंकांची घसरण होऊन बाजार ३७,२८२.१८ वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही १२० अंकांची घसरण होऊन तो ११,०११ वर उघडला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काहीच वेळात निर्देशांकात ५५० अंकांपर्यंतची घसरण झाली.

शेअर बाजारातील सर्व प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा. बजाज फिनसर्व, मारुती, अॅक्सिस बँकेच्या समभागांमध्ये १.५० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक, बांधकाम व्यवसाय, मीडिया आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये २ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली.

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली होती. औषध कंपन्या आणि बँकांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. अखेरच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६६ अकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात २२ अकांची घसरण होऊन बाजार अनुक्रमे ३७,६६८,४२ आणि ११,१३२ वर बंद झाला होता.

जागतिक बाजाराचा शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी अमेरिकेतील शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी डाओ ५०० अंकांनी तर नॅस्डॅक ३०० अकांनी घसरला होता. अॅपल, अॅमेझॉन, एनविडीयासारख्या दिग्गज कंपन्यांचे समभागही चार टक्क्यांपर्यंत घसरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2020 10:17 am

Web Title: bombay stock exchange down by 550 and nse down by 162 points thursday opening jud 87
Next Stories
1 जिओनंतर रिलायन्स रिटेलमध्ये ‘केकेआर’ची ५,५०० कोटींची गुंतवणूक
2 कोणावरही ‘स्मॉल-कॅप’मध्ये गुंतवणुकीची सक्ती नाही
3 वर्ष उलटले तरी तोडगा नाहीच!
Just Now!
X