मुंबई : अदिदास, रिबॉक, लीव्हाइस, पेपे, फिला, रेड टेप, सफारी, वाइल्ड क्राफ्ट, किलर ली कूपर, बफेलो आणि तत्सम अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय श्रेणीच्या लोकप्रिय फॅशन नाममुद्रांना सामावून घेणाऱ्या ‘ब्रॅण्ड फॅक्टरी’ या विक्री दालन शृंखलेने खरेदीदारांसाठी आनंददायी ‘फ्री शॉपिंग वीकएण्ड’ नावाच्या विशेष विक्री उत्सवाची घोषणा केली आहे. १२ डिसेंबर ते १६ डिसेंबर असे पाच दिवस तो चालणार आहे.

या वार्षिक उत्सवात, विक्री किंमत मूल्य ५,००० रुपये असलेल्या वस्तूंची खरेदी ग्राहकांना केवळ २,००० रुपये भरून करता येणार आहे. हे २,००० रुपयांचीही त्यांना परतफेड होईल, असे लाभ ब्रॅण्ड फॅक्टरीने देऊ केले आहेत. खरेदीदारांना त्यावर ५०० रुपयांचे तयार वस्त्र, १,२०० रुपये मूल्याचे गिफ्ट व्हाऊचर आणि फ्युचर पे वॉलेटमध्ये आणखी ३०० रुपये जमा केले जाण्याचे लाभ मिळविता येतील. म्हणजेच संपूर्ण खरेदी ही मोफतच केली जाईल, असे ब्रॅण्ड फॅक्टरीने यातून सूचित केले आहे.

मागील दोन वर्षांत या वार्षिक उत्सवादरम्यान खरेदीदारांनी विक्री दालनाबाहेर मोठय़ा रांगा लावून दमदार प्रतिसाद दिला आहे. गर्दीला टाळू पाहणाऱ्या ग्राहकांना २५० रुपये अथवा १०० रुपये अशा दोन प्रकारात उपलब्ध आणि क्रययोग्य असलेले  प्रवेश पत्र खरेदी करण्याची सोयही केली गेली आहे.