10 December 2018

News Flash

दलाली व्यवसाय : बाजारानुरूप बदलते कल

देशात आर्थिक वृद्धीचे पुनरुज्जीवन झाले. किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये समभागातील नफा लोकप्रिय होत गेला.

माहिती तंत्रज्ञानाची कास..

एक काळ होता जेव्हा फक्त २२ भांडवली बाजाराचे दलाल (ब्रोकर) च्या छोटेखानी अनौपचारिक गटाने मुंबईतील चर्चगेट भागातील वडाच्या झाडाखाली भारतीय शेअर बाजार क्षेत्राचा विस्तार केला. हे उद्योगक्षेत्र भारतातील एक आश्वासक क्षेत्र ठरले. देशात आर्थिक वृद्धीचे पुनरुज्जीवन झाले. किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये समभागातील नफा लोकप्रिय होत गेला. हा उद्योग आता एका भरीव वळणावर येऊन ठेपला आहे. भारताची लोकसंख्या झपाटय़ाने वाढते आहे. वाढत्या समृद्धीची ती संधी आहे. वित्तीय जागरुकता वाढली आहे. निम—शहरी भागांमध्येही त्या क्षमता आहेत. उद्योग क्षेत्रात भांडवलाकरिता मोठी मागणी आहे. तसेच गुंतवणूक बँकिंग आणि सल्लागार सेवा वृद्धिंगत होत आहेत.

आगामी काळात पाच प्रमुख कल हे भारतीय वाढीच्या आलेखाला आकार देऊ  शकतात, असा आमचा विश्वास आहे.

तंत्रज्ञानाचा फायदा करून घेणे :

‘डिस्काऊंट ब्रोकरेज’च्या आगमनामुळे उद्योगक्षेत्राला काही प्रमाणात व्यत्यय सहन करावा लागला. पुढची पायरी परिवर्तनशील आहे. त्यात रोबो—अ‍ॅडव्हायजर्स आणि कल्पक अल्गोरिदम ट्रेडिंग प्लॅटफॉम्र्स असतील. रोबो—अ‍ॅडव्हायजर्स हे गुंतवणूकदारांना अल्प दरातील गुंतवणूकविषयक सल्ला वेब—मोबाईल आधारित मंचांद्वारे पुरवतील. ते गुंतवणूकदारांच्या भावना प्रदर्शित करण्यासाठी किंवा विशिष्ट समभागाचे विविध मुलभूत आणि तांत्रिक मापदंडांची मोठय़ा प्रमाणावरील माहिती मिळवून त्याची प्रक्रिया करतील. काही आधीच ट्रेडिंग टूल्स आणि गुंतवणूकदारांकरिता असलेल्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट असते. ज्यामुळे भांडवली बाजारातील व्यवहाराची प्रकिया सुलभ होते. काही ठिकाणी कस्टमाईज्ड प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येतो. याद्वारे वापरकर्ता स्वत:चे अल्गोरिदम तयार करून सोपी पद्धती – धोरणे सुलभतेने हाताळू शकतील्२ा. काहींनी अशीही अ‍ॅप्लिकेशन्स तयार केली आहेत  ज्यामध्ये वापरकर्ते सातत्याने शिफारस नमूद करू शकतील. तसेच याबाबतचे कलही समाज माध्यमांवर सादर करता येतील.  याचा फायदा गुंतवणूकदारांना होऊन ते आवडत्या वापरकर्त्यांच्या धोरणांतून मदत मिळवतील.

मोठय़ा डेटावर सौदा :

भारतीय दलाली पेढय़ा (ब्रोकरेज हाऊस) आता मोठी माहिती विश्लेषक यंत्रणा बनली आहेत. ते बाजाराची हालचाल आणि डेटा—आधारित शिफारसी देऊ करतात. यामुळे ग्राहकही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील. आज तांत्रिक विश्लेषण किंवा किंमतीचा परस्पर संबंध नमुना किंवा दिशादर्शकासाठी दलाली हे उद्योग क्षेत्र तांत्रिक विश्लेषण मिळवण्याकरीता क्वचितच ऐतिहासिक डेटाचा वापर करते. बाजारातील काही मंच गुंतवणूकदाराला सरकार आणि केंद्रीय बँकांच्या प्रत्येक हालचाली, विलीनीकरण आणि ताबा, मिळकतीच्या घोषणा इत्यादीचे वृत्त अविरत लक्षावधी पर्यायांनी कळवत असतात.

ग्राहकांना टिकवून ठेवण्यावर वाढते लक्ष्य :

भांडवली बाजारांमध्ये अलीकडे आलेल्या वाढीमुळे त्वरित ग्राहक तळ विस्तारण्याची कवाडे खुली झाली. दलाली उद्योगक्षेत्र टप्याटप्याने मात्र खात्रीपूर्वक निम शहरी आणि ग्रामीण भागात ग्राहक संपादन तसेच त्यांना टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करून आहे. त्यांनी कामाच्या प्रक्रियेची पुनर्रचना करत स्वत:ला पुरेसे खंबीर ठेवत ग्राहक समाधानाची खातरजमा केली. अनेक दलाल घराण्यांनी आपल्या ऑनलाइन मंच अद्ययावत केला आणि ग्राहकांचा डेटा निरिक्षण करून त्यांना पुन्हा खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले. आणखी एक पाऊल पुढे म्हणजे दलाली घराण्यांमध्ये वर्तणुकीशी संबंधित विश्लेषण करून ग्राहकांना गरजेनुसार उत्पादने आणि सेवा पुरविल्या जातात. ग्राहकाशी नातेसंबंध बळकट करण्यासाठी वैयक्तिक संपर्क साधला जातो. ग्राहक डेटाचे विश्लेषणदेखील नवीन व्यवसाय संधी निर्माण करणारे ठरते.

कमी खर्चात कामात वृद्धी :

व्यापारातील वाढलेली स्पर्धा आणि मंदीचे वातावरण पाहता व्यापारात वाढ करण्याच्या दृष्टीने बहुतांश दलाल कमी मालमत्ता आणि कमी खर्चाची वाट चोखाळत आहेत.  काही लोक ‘फ्रेंचाइज मॉडेल’चा मार्ग स्वीकारत आहेत तर भविष्यातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही जण त्यांच्याच समवयस्कांशी हातमिळवणी करून मजबूत आणि स्थिर दलाल घराणी तयार करण्यासाठी एकत्र येत आहेत.  सकारात्मक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी आणि एकदंर ग्राहक अनुभव सुधारण्याच्या दृष्टीने तसेच किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने समवयस्क सहाय्यक ठरू शकतील.  हल्ली ‘डिस्काऊंट ब्रोकर्स’ (सवलत देणारे दलाल) आणि ‘फुल सर्विस ब्रोकर्स’ (संपूर्ण सेवा दलाल) अशी नवी संकल्पना तयार झाली आहे.  ‘डिस्काऊंट ब्रोकर्स’ व्यापाराच्या संधी देतात परंतु ते सल्ला देत नाहीत.  अशाप्रकारे ते त्यांच्या ग्राहकांना कमी खर्चात सेवा देऊ करतात.  तर ‘फुल सर्विस ब्रोकर्स’ हे व्यापाराच्या संपूर्ण संधी देण्यासोबतच ग्राहकांना सल्लादेखील देऊ करतात.

शाश्वत व्यापार सुनिष्टिद्धr(१५५)त करणे :

लक्षणीय वचनबद्धता असूनदेखील भारतीय भांडवल व्यापाराच्या चक्रीय स्वरूपामुळे दलाली उद्योग मोठय़ा प्रमाणावर प्रभावित होतो. जोखीम टाळणे आणि समभागांमधून पैसे काढून घेणे यांसारखे निर्णय घेण्यात भारतीय किरकोळ गुंतवणूकदार फार वेळ खर्च करत नाहीत.  बाजारातील सततच्या चढ—उताराच्या परिणामांना नियंत्रित करण्याच्या दृष्टीने, अनेक दलाली पेढय़ा त्यांच्या व्यापारात विविधता आणत आहेत तसेच बँकिंग व्यतिरिक्त अन्य आर्थिक सेवा विस्ताराचा संपूर्ण समावेश करता यावा यादृष्टीने त्यांची उत्पादने तयार करत आहेत. एकाच छताखाली विविध वित्तीय उत्पादने देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन म्युच्युअल फंड वितरण आणि अन्य पक्ष (थर्ड पार्टी) यांकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

उद्योगातील या उदयोन्मुख कल्पनेमुळे घरगुती दलालांना बळकटी मिळू शकेल आणि कामकाजाच्या कठीण वातावरणासाठी आणि व्यापाराच्या चक्रीय स्वरूपाला तोंड देण्यासाठी ते अधिक खंबीर होतील. अलीकडच्या काळात ‘लिक्विड एन्हांसमेंट’ योजना बंद केल्यानंतर तसेच वैकल्पिक व्यवहाराकरिता किमान करारात  वाढ केल्यानंतर या उद्योगाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. अशा प्रकारचा दबाव असूनदेखील ‘आयसीआरए’ सारख्या पतमानांकन संस्थेला चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत दलाली व्यवसायात १२ ते १५ टक्के वाढ होईल, अशी आशा आहे.

(लेखक रिलायन्स सिक्युरिटीजचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

First Published on January 2, 2018 2:00 am

Web Title: brokerage business share market