अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची व्याजदर निर्णयाबाबतची अनिश्चितता संपुष्टात येताच येथील भांडवली बाजारात गुरुवारी निधी ओघ मोठय़ा प्रमाणात वाढला. सेन्सेक्स २९,६०० नजीक वाटचाल करताना नव्याने गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. तर निफ्टीने ९,१५४ च्या रूपात एक दिवसात पुन्हा विक्रमी स्तर गाठला.

१८७.७४ अंश वाढीसह सेन्सेक्स २९,५८५.८५ वर गेला. यापूर्वी मुंबई निर्देशांक २९ जानेवारी २०१५ रोजी २९,६८१.७७ या टप्प्यावर होता.

bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Lower voter turnout in Maharashtra than national average What is the national average voter turnout
राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान, मतदानाची राष्ट्रीय सरासरी किती?
Sachin Tendulkar Investment
‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार, सचिन तेंडुलकरचाही सहभाग!

६८.९० अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९,१५३.७० वर पोहोचला. यामुळे मंगळवारचा ९,०८७ विक्रमी टप्पाही मागे पडला. गुरुवारच्या सत्रात निफ्टी ९,१५८.४५ पर्यंत झेपावला. मंगळवारी अनोख्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी नफेखोरीमुळे नाममात्र घसरण नोंदली गेली होती.

परकी चलन मंचावर डॉलरच्या तुलनेत ६५.४१ पर्यंत भक्कम होणाऱ्या रुपयाचेही भांडवली बाजारात गुरुवारी स्वागत झाले. स्थानिक चलनाने नव्याने गेल्या १६ महिन्यांचा सर्वोच्च स्तर अनुभवला. आशियातील काही तसेच युरोपातील सुरुवातीच्या अनेक भांडवली बाजारातील तेजीवरही येथे मूल्यवाढीचे व्यवहार नोंदले गेले.

सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्स सर्वाधिक, ४.७३ टक्क्यांसह वाढला. तर टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एशियन पेंट्स, इन्फोसिस, एचडीएफसी यांचे मूल्य वाढले. तर हीरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया घसरणीच्या यादीत स्थिरावले. सेन्सेक्समध्ये २४ समभागांचे मूल्य वाढले तर ६ समभाग घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, पायाभूत, भांडवली वस्तू २.८४ टक्क्यांपर्यंत वाढले. अपेक्षेप्रमाणे अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने पाव टक्क्याची व्याजदरवाढ भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी उशिरा जाहीर केली. त्याचे सकारात्मक पडसाद येथील प्रमुख निर्देशांकांवर सत्रप्रारंभापासूनच दिसून आले.

निर्यातवाढीचा षटकार!; आयातवृद्धीने व्यापार तुटीत वाढ

नवी दिल्ली : सलग सहाव्या महिन्यात देशाच्या निर्यात क्षेत्राने वाढ नोंदविली आहे. फेब्रुवारीमध्ये निर्यात १७.४८ टक्क्यांनी झेपावत २४.५ अब्ज डॉलरवर गेली आहे.

मात्र याच वेळी देशाची आयात वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम हा व्यापार तूट विस्तारण्यावर झाला आहे. गेल्या महिन्यात आयात २१.७६ टक्क्यांनी उंचावत ३३.३८ अब्ज डॉलर झाली. परिणामी आयात-निर्यातीतील दरी ८.८९ अब्ज डॉलपर्यंत वाढली आहे. वर्षभरापूर्वी ती ६.५७ अब्ज डॉलर होती.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांत निर्यात २.५२ टक्क्यांनी वाढून २४५.४० अब्ज डॉलर झाली आहे. तर एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान आयात ३.६७ टक्क्यांनी वाढत ३४०.७ अब्ज डॉलर झाली आहे. २०१६-१७ मधील फेब्रुवारीतील व्यापार तूट ९५.२८ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. वार्षिक तुलनेत त्यात यंदा लक्षणीय घसरण झाली आहे.