News Flash

तेजीचे तुफान उठले!

निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

निफ्टी सध्या नवीन उच्चांकावर असताना बाजारातील उत्साही, आनंदी वातावरणाचे चतुरस्र कवयित्री शांता शेळके यांच्या ‘वादल वारं सुटलं गो, तेजीचं तुफान उठलं गो’ या कोळीगीतातील काव्यपंक्तीतून सार्थ वर्णन ठरते. सध्याच्या बाजाराचे वातावरण असे उधाण वाऱ्यांनी भारलेले आहे. या स्तंभातील ४ मार्चच्या लेखात ‘निर्देशांक महत्त्वाच्या वळणिबदूवर’ या लेखातील महत्त्वाचे वाक्य होते- ‘येणाऱ्या १५ दिवसांत सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक अनुक्रमे २८,५०० आणि ८,८०० चा स्तर टिकवण्यात यशस्वी ठरले तर येणाऱ्या दिवसांतील सर्व किंतु-परंतुंना पूर्णविराम मिळून ३० ते ३१,००० आणि ९,१०० ते ९,३०० या पातळ्यांना निर्देशांक गवसणी घालतील. ४ मार्चनंतर शुक्रवारी बरोबर १४ व्या दिवशी निफ्टीने ९,२०० चा उच्चांक गाठणारी कामगिरी करून दाखविली.

निर्देशांकाचा शुक्रवारचा बंद भाव:  सेन्सेक्स- २९,६४९.८१/ निफ्टी- ९,१६०.२५

शेअर बाजारातील एक सुंदर सुभाषित आहे. ‘शेअर मार्केट इज क्लायिमग ऑन द वॉल ऑफ वरीज्’ अर्थात चिंतायुक्त वातावरणात शेअर बाजार नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत जातो.

सद्य:स्थितीतील चिंता :

१. बाजाराचे किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई रेशो) हे १९ वर आले आहे.

२. स्टॉकेस्टिक्स / ऑसिलेटर्स हे अत्युच्च खरेदी (ओव्हर बॉट) पातळीवर आहेत.

३. दोन्ही निर्देशांकांवर अनुक्रमे २९,०७६ ते २९,३५६ आणि ८,९७५ ते ९,०६० ही पोकळी (गॅप) आहे ती कधी भरणार?

४. सर्वात महत्त्वाचे मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर ४,००० अंशांची व निफ्टीवर १,३०० अंशांची सलग वाढ ही अवघ्या अडीच महिन्यांत झाली आहे. त्यामुळे ‘आम्ही समभाग घेतल्यावर बाजार कोसळणार तर नाही ना?’ हा आज सर्वालेखी कळीचा प्रश्न आहे.

या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण तांत्रिक विश्लेषणाकडे वळू या.

आजच्या घडीला निर्देशांकांना २८,८०० ते २९,००० आणि ८,९०० ते ९,००० चा भरभक्कम आधार आहे. या पातळ्यांपर्यंत संक्षिप्त घसरण अपेक्षित आहे. या घसरणीत निर्देशांक भरभक्कम आधार टिकवण्यात यशस्वी ठरला तर निर्देशांकाचे भविष्यकालीन वरचे उद्दिष्ट हे सेन्सेक्ससाठी ३१,००० आणि निफ्टीसाठी ९,३०० ते ९,४५० असे असेल.

लक्षवेधी समभाग..

महिंद्र लाइफ स्पेस डेव्हलपर्स लि. शुक्रवारचा बंद भाव : रु. ३७८.१०

महिंद्र लाइफ स्पेसचा आजचा बाजारभाव हा १०० दिवस (३६८), ५० दिवस (३५७), २० दिवस (३५५) या चलत सरासरीनुरूप आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण स्तर ३४० ते ३८० रुपये आहे. ३८० रुपयांवर भाव टिकल्यास हा समभाग ४०७ रुपये, जी या समभागाची २०० दिवसांची चलत सरासरी आहे तिथपर्यंत जाईल. ४१० रुपयांच्या वर उलाढालीचा (व्हॉल्यूम) आधार लाभल्यास शाश्वत तेजी सुरू होऊन पहिले वरचे उद्दिष्ट ४५० रु. व नंतर दीर्घकालीन उद्दिष्ट ५००-५५० रु. असे असेल. या दीर्घकालीन गुंतवणुकीला रु. ३३० हा स्टॉप लॉस स्तर ठेवावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:22 am

Web Title: bse nse nifty sensex 19
Next Stories
1 कंपन्यांनी पाठ फिरविल्याने बँक कर्जमागणीत घट
2 फेड दरवाढीचे भारतावर सावट नाही!
3 निफ्टीची विक्रमी दौड सुरूच!
Just Now!
X