11 December 2017

News Flash

भांडवली बाजारात संमिश्र व्यवहार

सप्ताहअखेर निर्देशांकात किरकोळ हालचाल

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: June 17, 2017 2:06 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सप्ताहअखेर निर्देशांकात किरकोळ हालचाल

एक दिवसाच्या घसरण सत्रानंतर भांडवली बाजारात पुन्हा एकदा संमिश्र व्यवहार नोंदले गेले. किरकोळ घसरणीसह सेन्सेक्स बंद झाला, तर नाममात्र वाढीसह निफ्टीने सप्ताहाची अखेर केली.

मुंबई निर्देशांकात १९.३३ अंश घसरण होऊन सेन्सेक्स ३१,०५६.४० वर स्थिरावला, तर निफ्टीत १० अंश भर पडून राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ९,५८८.०५ वर बंद झाला. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी सलग दुसरी सप्ताह घसरण यंदा नोंदविली आहे. या दरम्यान सेन्सेक्स २०५.६६ अंश तर निफ्टी ८०.२० अंशांनी खाली आला आहे.

गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स तसेच निफ्टी त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून ढळले होते. असे करताना सेन्सेक्स ३१ हजारांवर तर निफ्टी ९,६००च्या खाली आला होता.

सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात तेजीसह करताना निफ्टीने पुन्हा एकदा ९,६०० वरील टप्पा गाठला, तर सेन्सेक्सचा वरचा सत्रस्तर ३१,१८२.७३ होता.

मेमधील वाढत्या निर्यातक्षेत्राची छाया तसेच डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयाचे पडसादही बाजारात आवठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात उमटले. तसेच जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर गेल्या सात महिन्यांच्या तळात विसावल्याची दखलही गुंतवणूकदारांकडून बाजारात व्यवहार करताना घेतली गेली.

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स सर्वाधिक १.५७ टक्क्यांनी वाढला, तर आयटीसी, अदानी पोर्ट्स, स्टेट बँक, एनटीपीसी यांचेही मूल्य २ टक्क्यांपर्यंत वाढले. अमेरिकेच्या अन्न व औषध नियामकांच्या र्निबधामुळे या क्षेत्रातील ल्युपिन, इप्का आदींचे मूल्य रोडावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यनिगा निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक प्रमाणात खाली आले.

First Published on June 17, 2017 2:06 am

Web Title: bse nse nifty sensex part 15