रिझव्‍‌र्ह बँकेच्या तिमाही पतधोरणाबाबत धास्ती आणि सावधगिरी म्हणून गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभी भांडवली बाजारापासून लांब राहणे पसंत केले. परिणामी सोमवारी १५४.९१ अंश घसरणीसह सेन्सेक्स तीन आठवडय़ाच्या नीचांकाला म्हणजे १९,५९३.२८ वर येऊन ठेपला आहे. निफ्टीही ५४.५५ अंश घसरणीने ५,८३१.६५ पर्यंत घसरला.
रुपयात ३७ पैशांनी घसरण
डॉलरच्या तुलनेतील रुपयाची नरमाई निरंतर कायम असून, भारतीय चलन सोमवारी प्रति डॉलर ३७ पैशांनी घसरत दिवसअखेर ५९.४१ पातळीवर स्थिरावले. गेल्या आठवडय़ात सलग दोन सत्रात चलनात स्थिरता अनुभवली गेली. गेल्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपायांचा परिणाम म्हणून तीन दिवसांत मिळून रुपया ७२ पैशांनी (१.२ टक्के) उंचावला होता. यातून डॉलरच्या तुलनेत तो जुलै महिन्याच्या वरच्या टप्प्यावर होता.