मागच्या तीन दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. बुधवारी दिवसअखेरीस मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९९ अंकांच्या वाढीसह ४१,०२०.६१ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६३ अंकांच्या वाढीसह १२,१०० अंकांवर बंद झाला.

आज दिवसभराच्या ट्रेडिगमध्ये सेन्सेक्स २५४.४६ अंकांची उसळी घेऊन ४१,०७५.७६ अंकांवर पोहोचला होता. मंगळवारी सेन्सेक्स दिवसअखेरीस ४०,८२१.३० पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सत्रात १२ हजारांवर स्पर्श केला. दिवसअखेर निफ्टी १२,०३७.७० वर स्थिरावला.

बुधवारी निफ्टी ६३ अंकांच्या वाढीसह १२,१०० वर बंद झाला. बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्राच्या शेअर्समध्ये आज तेजी होती.