News Flash

बाजार पुन्हा नरम; प्रमुख निर्देशांकात किरकोळ घसरण

भांडवली बाजाराने घसरणीचा कित्ता मंगळवारी पुन्हा एकदा गिरविला. सेन्सेक्सने २८ हजार तर निफ्टीने ८,५०० खालील प्रवासाची सुरुवात सप्ताहारंभाने केल्यानंतर आठवडय़ाच्या दुसऱ्या व्यवहारातील सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये

| August 19, 2015 03:56 am

भांडवली बाजाराने घसरणीचा कित्ता मंगळवारी पुन्हा एकदा गिरविला. सेन्सेक्सने २८ हजार तर निफ्टीने ८,५०० खालील प्रवासाची सुरुवात सप्ताहारंभाने केल्यानंतर आठवडय़ाच्या दुसऱ्या व्यवहारातील सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ घसरण नोंदली गेली.
तेजीसह व्यवहाराची सुरुवात करणाऱ्या बाजारात मूडीजद्वारे कमी अंदाजित केलेल्या भारताच्या विकास दराबाबत नाराजी व्यक्त झाली. परिणामी, ४६.७३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,८३१.५४ वर तर १०.७५ अंश नुकसानासह निफ्टी ८,४६६.५५ पर्यंत आला.
एकूण सेन्सेक्स घसरणीमुळे गेले दोन दिवस भाव कमाविणारे बँक समभाग मंगळवारी मात्र घसरले. त्याचबरोबर मुंबई निर्देशांकातील एचडीएफसी, ल्युपिन, सन फार्मा आदी आघाडीचे समभागही घसरले. सुरुवातीच्या तेजीमुळे व्यवहारात सेन्सेक्सने २८ हजारांचा पल्ला गाठला होता. मात्र नंतर त्यात घसरण येऊन दिवसअखेरही निर्देशांक सोमवारच्या तुलनेत नकारात्मक स्थितीत कायम राहिला.  सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य घसरले. गेल, कोल इंडिया, सिप्ला, टाटा स्टील, मारुती, इन्फोसिसला कमी मागणी राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:56 am

Web Title: bse sensex ends marginally lower
टॅग : Bse,Bse Sensex
Next Stories
1 तुटीचा पाऊस अन् रखडलेल्या आर्थिक सुधारणांचे आर्थिक विकासदरावर सावट
2 ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीने सेवाक्षेत्राची दुहेरी अंकातील वाढ शक्य ; अर्थमंत्र्यांचा दावा
3 ‘पेब्स’ची १५७ कोटींची भागविक्री २५ ऑगस्टपासून
Just Now!
X