News Flash

विक्रमसूर निर्देशांकांची अभूतपूर्व मजल

विदेशातून संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला डॉलर-पौंडाचा पाऊस आणि निरंतर तेजीने स्थानिक गुंतवणूकदारांमध्ये भारलेला उत्साह या जोरावर सेन्सेक्सने गुरुवारी सलग सहाव्या दिवशी आणखी ७८ अंशांची वाढ

| August 29, 2014 01:05 am

विदेशातून संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला डॉलर-पौंडाचा पाऊस आणि निरंतर तेजीने स्थानिक गुंतवणूकदारांमध्ये भारलेला उत्साह या जोरावर सेन्सेक्सने गुरुवारी सलग सहाव्या दिवशी आणखी ७८ अंशांची वाढ नोंदवीत आपली स्वप्नवत भरारी कायम ठेवली. दिवसअखेरची सेन्सेक्सची २६,६३८.११ ही आजवरची सार्वकालिक उच्चांकी पातळी आहे, ती गेले चार दिवस सतत नव्या पातळीला गाठत आली आहे. निफ्टीनेही सलग तिसऱ्या दिवशी १८ अंशांची भर घालत ७,९५४.३५ असे अभूतपूर्व शिखर दाखविले. भांडवली बाजारात व्यवहाराचा हा ऑगस्ट महिन्यांतील शेवटचा दिवस होता आणि निर्देशांकांच्या लक्षणीय मासिक वाढीची मालिका  सलग सातव्या महिन्यात कायम राहिली आहे, हाही शेअर बाजाराच्या अलीकडच्या इतिहासातील एक विक्रमच आहे. अर्थसुधारणांच्या पथावर मोदी सरकारची वाटचाल बाजाराच्या पसंतीस उतरली असून, अनेक दलालपेढय़ांनी तेजीला नजीकच्या काळात खंड पडणे दृष्टीपथात नसल्याचे सांगताना, निर्देशांकांच्या उंचीबाबत अंदाज उत्तरोत्तर वाढवीत नेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:05 am

Web Title: bse sensex hits record high
Next Stories
1 ‘डीजें’ना तंत्र साद!
2 महानगर बँकेकडून ‘महा रूपे डेबिट’ कार्ड
3 व्यापार संक्षिप्त : मुंबई: ऑनलाइन देणग्या, लाइव्ह आरती,
Just Now!
X