विक्रमाच्या लाटेवरील सेन्सेक्सची आगेकूच गुरुवारीही सुरुच असून गुरुवारी सेन्सेक्सने पहिल्यांदाच ३७ हजारांचा पल्ला गाठला. तर निफ्टीनेही पहिल्यांदाच ११, १७२ पर्यंत ऐतिहासिक झेप घेतली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचे सकारात्मक परिणाम भारतातील शेअर बाजारावर उमटत आहेत. गुरुवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने १४४ अंकांनी झेप घेत ३७ हजारचा पल्ला गाठला. तर निफ्टीनेही ११, १७२ वर झेप घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपीय महासंघात व्यवसायासंदर्भातील काही महत्त्वाचे करार झाले. याचे परिणाम जगभरातील शेअर बाजारावर होत आहेत. सार्वजनिक बँका, पायाभूत सुविधा आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर वधारले असून फार्मासिटीकल कंपन्यांच्या शेअरचे मूल्य घसरले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 9:42 am