लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकरी, मध्यमवर्गीय, कामगार, उद्योजक अशा विविध स्तरावरील शेअर बाजारानेही मुसंडी मारली आहे. सेन्सेक्स ४०० अंकांनी तर निफ्टीही १४६ अंकांनी वधारला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला. कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना मोदी सरकारने अर्थसंकल्पातून भेट दिली असून पाच लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर केले असता शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण दिसून आले. सेन्सेक्स ४१५. २० अंकांनी वधारुन ३६, ६७२.०१ पर्यंत पोहोचला. तर निफ्टीनेही ११६. ६० अंकांची झेप घेत १०, ९४७. ६० चा पल्ला गाठला. दुपारपर्यंत सेन्सेक्सने पाचशे तर निफ्टीनेही १५५ अंकांनी वधारला.

मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला. यामुळे ऑटोमोबाइल, गृहनिर्माण क्षेत्रात मागणी वाढले. अर्थसंकल्पात संतुलन साधल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.