News Flash

तीन वर्षांत ३०० नवीन प्लॅनेट फॅशन स्टोअर्सचे लक्ष्य

आदित्य बिर्ला समूहातील मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइल या उपकंपनीचे ‘प्लॅनेट फॅशन’ या नावाची विक्री शृंखलेची आगामी तीन वर्षांत आणखी ३००

| July 7, 2015 07:31 am

मुंबई: आदित्य बिर्ला समूहातील मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइल या उपकंपनीचे ‘प्लॅनेट फॅशन’ या नावाची विक्री शृंखलेची आगामी तीन वर्षांत आणखी ३०० दालने सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या देशभरात १७६ शहरांमध्ये २२५ दालनांसह प्लॅनेट फॅशन ही वस्त्रप्रावरणांची सर्वात मोठी विक्रीशृंखला म्हणून प्रसिद्ध आहे. प्लॅनेट फॅशनच्या आक्रमक विस्तार वाटचालीला नवीन बोधचिन्हासह नवी ओळखही प्रदान करण्यात आली आहे. या नव्या ब्रँड प्रतिमेचे अलीकडेच बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या हस्ते समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. लुई फिलिप, व्हॅन ह्य़ूजेन आणि अ‍ॅलन सोली या नाममुद्रेची तयार वस्त्रे या दालनात उपलब्ध असतील.

‘ई-क्लास’तर्फे शैक्षणिक मेमरी कार्ड
मुंबई:  पहिली ते दहावी इयत्तेच्या महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी) अभ्यासक्रमासाठी उपयुक्त दृक-श्राव्य साहित्य, प्रश्नोत्तरे, उजळणी आणि बरेच काही एका छोटय़ा एसडी कार्डच्या रूपात ई-क्लास एज्युकेशन सिस्टीम लिमिटेड (www.e-class.in)) या कंपनीने प्रस्तुत केले आहे. अँड्रॉइड कार्यप्रणालीवर आधारित स्मार्टफोन आणि टॅब्लेट्समध्ये हे मेमरी कार्ड वापरून विद्यार्थ्यांना कधीही, कोणत्याही अगदी प्रवासात असतानाही आपला अभ्यास आणि सराव करता येईल. अत्यंत माफक किमतीतील हे कार्ड आघाडीच्या स्टेशनरी विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

अस्पायर होम फायनान्सची ‘माला’ महिला
मुंबई: मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सíव्हसेस लिमिटेडची गृहवित्त क्षेत्रातील उपकंपनी अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने खास महिलांनी महिलांकरिता चालविलेला गृह कर्ज विभाग ‘माला’ची पहिली शाखा नायगाव येथे नुकतीच सुरू केली. किफायतशीर घरांच्या खरेदी अथवा बांधणीसाठी निम्न उत्पन्न गटातील नोकरदार तसेच स्वयंरोजगार मिळविणाऱ्या महिलांना गृहकर्ज साहाय्य आणि सल्ला या शाखेतून पुरविला जाणार आहे. माला खाजगी कंपन्या, लघुउद्योगात अथवा अगदी घरकाम करणाऱ्या, फेरीवाल्या, फळ-भाजी विक्रेत्या, शिवणकाम, उदबत्ती बनविणे, पापड बनविणे, तयार कपडे बनविणे, स्वयंपाकाची कामे करणे, विणकाम, धुलाई, शिकवणी, लग्नाची कंत्राटे याद्वारे स्वयंरोजगार मिळविणाऱ्या महिलांना दोन लाख ते १२ लाखांपर्यंतचे गृह कर्ज देणार आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश येथे टप्प्याटप्प्याने मालाच्या अजून काही शाखा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे, असे तिचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल सच्चिदानंद यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 7:31 am

Web Title: business news 3
टॅग : Arthsatta,Business News
Next Stories
1 टाटांचे ‘अनोखे’ डिजिटल इंडिया..
2 नाणेनिधी, युरोपीय समुदायाचे ग्रीसला धोक्याचे इशारे
3 देशाची अर्थव्यवस्था २ लाख कोटी डॉलरहून मोठी
Just Now!
X