News Flash

अर्थ-संक्षिप्त: एलईडी बाजारपेठेची ५० टक्के वृद्धी

गोरेगाव, मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘एलईडी एक्स्पो २०१६’

एलईडी भारतीय बाजारात गेल्या पाच वर्षांपासून ५० टक्क्य़ांनी वाढत असून पुढील पाच वर्षांत या वाढीच्या दरात सातत्य अपेक्षित आहे; म्हणूनच सरकार एलईडीला ऊर्जा कार्यक्षम आणि शक्ती प्रकाश पर्याय बचत म्हणून पुढे करत आहे, असा दावा राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला.
गोरेगाव, मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘एलईडी एक्स्पो २०१६’ प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र ऊर्जा विकास एजंसीचे महासंचालक नितीन गद्रे, बेस्टचे व्यवस्थापक जगदीश पाटील आदी उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनामध्ये चीन, हॉंग कॉंग, कोरिया, तवान, अमेरिका आणि भारत अशा वेगवेगळ्या देशातून १५० हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ‘एलईडी एक्स्पो’ दरवर्षी दिल्ली आणि मुंबईमध्ये डिसेंबर आणि मेमध्ये होतो. यामध्ये फक्त एलईडी उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले जाते.
ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रीयन आघाडीवर!
मुंबई : गेल्या वर्षांत महाराष्ट्रातून ऑस्ट्रेलियाला भेट देण्याकरिता गेलेल्या पर्यटकांनी २३.६० कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे १,१४५ कोटी रुपये) खर्च केले असून महाराष्ट्र हे ऑस्ट्रेलियाला भारतातून सर्वात जास्त पर्यटन महसूल मिळवून देणारे राज्य ठरले आहे. संपूर्ण २०१५ मध्ये महाराष्ट्रातील ४९,५०० पर्यटकांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली आणि ऑस्ट्रेलियामध्ये व्यतीत केलेल्या सुटय़ांमध्ये या पर्यटकांनी अंदाजे १,१४५ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती ‘टुरिझम ऑस्ट्रेलिया’च्या भारत व आखाती देशांचे देशस्तरीय व्यवस्थापक निशांत काशिकर यांनी दिली. ऑस्ट्रेलियाला भारतातून सर्वाधिक महसूल मिळवून देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राने आपले स्थान पक्के केले आहे. या संख्येत अधिक वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
आस्क ग्रुपचे एटीएस इफ्रास्ट्रक्चरमधून निर्गमन
मुंबई : वैविध्यपूर्ण वित्त सेवा पुरवणाऱ्या आस्क ग्रुपची रिअल इस्टेट प्रायव्हेट इक्विटी शाखा असलेल्या आस्क प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेण्ट अ‍ॅडव्हायझर्स (आस्कपिया) ने आपली सहावी निर्गुतवणूक घोषित केली आहे. आस्क पियाचा दुसरा स्थानिक निधी असलेल्या आस्क रिअल इस्टेट स्पेशल अपॉच्र्युनिटिज फंडमधून एटीएस इफ्रास्ट्रक्चरच्या ‘एटीएस टँजरीन’ या गुरगावमधील सेक्टर ९९ एमध्ये असलेल्या आणि द्वारका-गुरगाव एक्प्रेसवेला लागून असलेल्या प्रकल्पात केलेली २७० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. आस्क ग्रुपने जुल २०१३ मध्ये एटीएस ग्रुपमध्ये १४७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तीन वर्षांहून कमी कालावधीमध्ये त्यांना २५ टक्के इतक्या आयआरआरसह आणि १.८२ च्या पटीतील परताव्यांसह मिळकत प्राप्त आली आहे.
ह्य़ुंदाईची भारतात
४२ लाख कारविक्री
मुंबई : भारतीय वाहन व्यवसायातील २० वे वर्ष साजरे करणाऱ्या ह्य़ुंदाई मोटर इंडिया या मूळच्या कोरियन कंपनीने या कालावधीत ४२ लाख कारच्या विक्रीची नोंद केली आहे. वाहनविक्रीबाबत मारुती सुझुकीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची ह्य़ुंदाई ही निर्यातीबाबत अव्वल स्थानावर आहे. कंपनीने गेल्या दोन दशकांमध्ये २३ लाख वाहने निर्यात केली आहेत. १९९९ मध्ये भारतातील वाहन बाजारपेठेत उतरलेल्या ह्य़ुंदाईने सॅन्ट्रो या हॅचबॅक श्रेणीतील वाहननिर्मितीद्वारे आपले स्थान अल्पावधीतच भक्कम केले. केवळ प्रवासी कारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करत कंपनी अल्पावधीत मारुती सुझुकीची कट्टर स्पर्धक बनली. ह्य़ुंदाई मोटर इंडियाच्या २० व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक योंग के कू यांनी कंपनी भारतात वर्षांला दोन वाहने सादर करेल, असे स्पष्ट केले, तर येत्या दोन दशकांमध्ये कंपनी भारतात अव्वल स्थानावर असेल, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 8:01 am

Web Title: business news 9
Next Stories
1 फक्त दोन तिमाही जाऊ द्या; अधिक परतावा दृष्टिक्षेपात आहे!
2 बुडीत कर्जे वाढली; मात्र स्थिती सुधारेल..
3 नकारात्मक घटनांकडे बाजाराचे दुर्लक्ष
Just Now!
X