मास्टर आणि व्हिसा या परदेशातील कार्डाना देशी पर्याय म्हणून ‘रूपे डेबिट कार्डा’ची संकल्पना स्वीकारत कल्याण जनता सहकारी बँकेनेही आपल्या ग्राहकांसाठी या कार्डाचे अलीकडेच अनावरण केले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी एन. पी. होता यांच्या हस्ते या डेबिट कार्डाचे उद्घाटन करण्यात आले. या डेबिट कार्डाचा वापर देशभरातील आठ लाख दुकाने-विक्री केंद्रांमध्ये खरेदी-विनिमयासाठी करण्याबरोबरच, एटीएम केंद्रातून खात्यातील रोख रक्कम काढण्यासाठी बँकेच्या ग्राहकांना करता येईल. बँकेचे अध्यक्ष मोहन आधारकर यांनी या निमित्ताने बँकेच्या प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर ठेवला. याच कार्यक्रमात बँकेच्या तंत्रज्ञानात्मक सोयीसुविधांची माहिती मुख्याधिकारी अतुल खिरवडकर यांनी दिली आणि तर ‘नॉलेज मॅनेजमेंट पोर्टल’चे उद्घाटन एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रीव्हज् कॉटनच्या बनावट  ऑटो पार्ट्सचा साठा जप्त
मुंबईसह महाराष्ट्र व कर्नाटकातील बाजारात वितरणासाठी तयार केला गेलेला वाहनांच्या सुटय़ा भागांचा मोठा साठा पोलिसांनी गुरुवारी जप्त केला. ग्रीव्हज् कॉटन लि.ची नाममुद्रा बेकायदा वापरून हा बनावट माल आग्रा, उत्तर प्रदेशस्थित पीएस चट्टा परिसरात पोलिसांनी छापे टाकून तो हस्तगत केला.