फेडरल बँकेने यंदाच्या सणानिमित्त आपल्या सर्व डेबिट कार्डधारकांना १० हजार रुपयांहून अधिक किमतीच्या सॅमसंग मोबाइल फोन आणि टॅब्लेटच्या खरेदीवर १०% कॅशबॅक सवलत जाहीर केली आहे. ही सवलत सॅमसंगच्या सहयोगाने देण्यात आली आहे आणि ती देशभरातील ९ हजारांहून अधिक निवडक विक्री दालनांमध्ये उपलब्ध आहे. ही सवलत १० सप्टेंबपर्यंत लागू राहील. ही सवलत म्हणजे डेबिट कार्डधारकांना रिवॉर्ड देण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ईबे, मंत्रा, इन्फिबीम, रेडबस अशा संकेतस्थळामार्फत केलेल्या खरेदीवर बँक सध्या आकर्षक सवलत देत आहे. बँकेचे डेबिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर बँक सध्या ‘उत्सव रिवॉर्डस’ हा उपक्रम चालविण्यात येत आहे.
मिहद्रा लॉजिस्टिक्सकडून ‘लॉर्डस् फ्रेट’मधील हिस्सा संपादन
मुंबई : मिहद्र समुहाचा भाग असलेल्या मिहद्रा लॉजिस्टिक्सने (एमएलएल) ‘लॉर्डस् फ्रेट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ (लॉर्डस्) मधील मोठा हिस्सा ताब्यात घेत असल्याची घोषणा केली आहे. मिहद्रा अ‍ॅन्ड मिहद्रा लिमिटेडची सहयोगी मिहद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड भारताची अग्रगण्य ‘थर्ड पार्टी लॉजिस्टिक’ (३पीएल) सेवा पुरवठादार आहे. २००९ मध्ये मिहद्रा ग्रुपने लॉजिस्टिक्सला प्रमुख क्षेत्र म्हणून अधोरेखित केले होते. तेव्हापासून, एमएलएल मिहद्रा ग्रुपच्या ९० कोटी डॉलरचा प्रायव्हेट इक्विटी विभाग मिहद्रा पार्टनर्स विभागाचा उपक्रम बनला आहे. लॉर्डस् ही मुंबईस्थित कंपनी आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स उपायांमध्ये विशेषीकृत आहे. २०११ मध्ये स्थापित, लॉर्डस् भारतीय लॉजिस्टिक्स उद्योगामध्ये उत्कृष्ट व्यवसाय संधी उपलब्ध करत आहे.
संदीप पिंगळे ऱ्हिनस लॉजिस्टिक्सचे भारतातील प्रभारी
मुंबई: जगभरात ४ अब्ज युरोची उलाढाल असलेल्या ऱ्हिनस समूहाने देशांतर्गत व्यवसायाचे प्रभारी म्हणून संदीप पिंगळे यांची ‘कंट्री मॅनेजर’ या पदावर नियुक्तीची नुकतीच घोषणा केली. पिंगळे यांच्यावर या आस्थापनेत प्रामुख्याने फ्रेट फॉरवìडग, कस्टम ब्रोकरेज आणि एकात्मिक दळणवळण व्यवसायावर देखरेखीची जबाबदारी राहील. दळणवळण क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या पिंगळे यांना या क्षेत्राचा दांडगा अनुभव असून ते डीएचएल आणि जिओलॉजिस्टिक्स/ अ‍ॅजिलिटी लॉजिस्टिक्समध्ये वरिष्ठ व्यवस्थापकीय पदावर यशस्वी कारकिर्दीनंतर या सेवेत रुजू झाले आहेत.
‘शिवकृपा’ची एकूण व्यवसायात २००० कोटींची संकल्पपूर्ती
मुंबई: राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य शिवकृपा सहकारी पतपेढीने देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी २००० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाची उद्दिष्टपूर्ती केली. सात विभागीय कार्यालये आणि ७० शाखांच्या माध्यमातून आणि सामुदायिक प्रयत्नाअंती हा २००० कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठणारी कामगिरी केल्याचे शिवकृपाचे अध्यक्ष अविनाश भोसले यांनी सांगितले. संस्थेने ठेवीत १,११४ कोटींचा, तर ९०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करून २०१४ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय केला आहे. ३२ वर्षांच्या वाटचालीत ही कामगिरी सहकारातील मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया संस्थेचे मानद सचिव पंढरीनाथ भोसले आणि संस्थापक संचालक कृष्णा शेलार, चंद्रकांत वंजारी यांनी व्यक्त केली. संस्थेकडून आता ३,००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.
चितारी ट्रॅव्हल्सचा काश्मीरमध्ये गौरव
मुंबई : गेली ४५ वर्षे सातत्याने काश्मीर सहली आयोजित करून १९८९ ते २००२ या अतिरेक्यांच्या उग्र कारवाया सुरू असतानाही पर्यटक नेण्याच्या प्रवाहात खंड पडू न दिल्याची उचित दखल घेत मुंबईस्थित चितारी ट्रॅव्हल्सचा जम्मू आणि काश्मीर सरकारने सन्मान केला आहे. तेथील सचिवालयात झालेल्या समारंभात चितारी ट्रॅव्हल्सचे संचालक नारायण ऊर्फ प्रमोद वसंत चितारी यांना जीवन गौरव पुरस्कार आणि २५ हजार रुपये रोख प्रदान करून कॅबिनेटमंत्री नझीर अहमद खान (गुरेझी) यांनी त्यांना गौरविले. शाही काश्मीरमधील समुद्रसपाटीपासून १८,००० फुटांपर्यंत उंच निसर्गाने नटलेल्या आणि पर्यटकांच्या दृष्टिआड राहिलेल्या गुरेझ, तुलेल, चंदीगाम, लोलाब व्हॅली, वूलर लेक आणि मानसबल यांसारख्या अप्रतिम स्थळांना चितारी यांनी आयोजित केलेल्या सहलींनी आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांनी उजेडात आणले, असा यानिमित्ताने दिलेल्या गौरवपत्रात खास उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वीही काश्मीर सरकारने चितारी यांना काश्मीर रत्न पुरस्कार आणि ‘धाडशी प्रवासी’ अशी विशेष गौरवपत्रे दिलेली आहेत.