मराठी उद्योजकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय भरभराटीस आणावा याकरिता मराठी बिझनेस क्लबने ‘ई-कॉमर्स : काळाची गरज’ या विषयावरील कार्यक्रम माटुंगा येथे नुकताच आयोजित केला होता. यावेळी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दास ऑफशोरचे संचालक अशोक खाडे, ई कॉमर्स तज्ज्ञ इंडियन स्कूल ऑफ ई बिझनेसचे संस्थापक नयन भेडा, मराठी बिझनेस क्लबचे संचालक सुहास कुंभार आदी उपस्थित होते.
आस्कमीबझार.कॉमतर्फे ‘ग्रो विथ अस’ मोहीम
मुंबई : आस्कमीबझार.कॉम या भारतातील ऑनलाइन बाजारमंचाने ऑनलाइन विक्रेत्यांसाठी ‘ग्रो विथ अस’ संकल्पनेंतर्गत नवी कम्युनिटी सुरू केल्याचे जाहीर केले. या व्यासपीठावर देशभरातील विक्रेत्यांना ते त्यांच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी व्यवसायाच्या विविध पलूंचे कसे व्यवस्थापन करतात ते स्पष्ट करता येईल. विक्रेत्यांना अनुभव, शिक्षण, उत्तम पद्धती, ट्रेंड, आव्हाने आदी बाबतीत जोडले जाता यावे, संवाद साधता यावा, देवाण-घेवाण करता यावी व मौल्यवान दृष्टिकोन देता यावेत म्हणून सेवा देणारी एकत्रित सहयोगी कम्युनिटी बनणार आहे, असा विश्वास यानिमित्ताने आस्कमीबझारचे प्रमुख पारिजात तिवारी यांनी व्यक्त केला.
मराठी उद्योजकांची दिवाळी पहाट
मुंबई : ‘मराठी उद्योजकांची दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर सभागृह, दादर येथे नुकताच झाला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मराठी बिझनेस क्लब, बिझनेस मेन्स असोसिअशन ऑफ महाराष्ट्र, मराठी इंटरनेशनल क्लब, समृद्धी बिझनेस क्लब, नेट्वìकग स्क्वेअर, झेप उद्योगीनीची, मी उद्योजक होणारच अशा संस्था कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. ‘अर्थसंकेत’ या अर्थविषयक मंचातर्फे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुभाष दांडेकर, विजय पाध्ये, अनंत भालेकर, मकरंद पाटील, निलेश हळदे, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे पेडणेकर, सॅटर्डे क्लबचे संस्थापक माधवराव भिडे आदींची उपस्थिती होती.
गेलतर्फे भारतीय कंपनी धोरण विकसित
मुंबई : गेल (इंडिया) लिमिटेड या देशातील आघाडीच्या वायू कंपनीने ‘द एनर्जी अँड रिसोस्रेस इन्स्टिट्यूट (टेरी) या उर्जा व सस्टेनेबिलिटी संस्थेबरोबर सहकार्य करार केला असून याद्वारे वातावरणातील बदल हाताळण्यासाठी भारतीय कंपनी धोरण तयार केले जाणार आहे. हे धोरण सरकारच्या योजनांशी सुसंगत असेल, अशी माहिती गेल इंडियाच्या वतीने देण्यात आली. ‘दिल्ली ते पॅरिस : वातावरण बदलासंदर्भातील कंपनी धोरण’ असे या आराखडय़ाचे नाव असून ते टेरी- सीबीएस (कौन्सिल फॉर बिझनेस सस्टेनेबिलीटी) यांनी वातावरण बदल हाताळणी विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आले होते. याबाबतची अंतिम कागदपत्रे या महिन्याच्या अखेर पॅरिसमध्ये होणाऱ्या इंडिया पॅव्हिलियन ऑफ कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (सीओपी) येथे सादर केली जाणाहर आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार आहेत.
कारदेखो.कॉमचा एफएडीएसोबत करार
मुंबई : कारदेखो.कॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ऑटोमोबाइल कंपनीने फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन्स (एफएडीए) या वाहन वितरकांच्या राष्ट्रीय संस्थेबरोबर करार केला आहे. यामुळे एफएडीए आणि कारदेखो.कॉम एकत्रितरीत्या भारतीय वाहन वितरकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचे फायदे करून देतील. या करारानुसार कारदेखो.कॉम एफएडीएबरोबर संयुक्तपणे २०१६ चा वाहन मेळा, एफएडीएचे नववे द्विवार्षकि वाहन वितरक संमेलन भरवणार असून ते डिजिटल डिलर या संकल्पनेवर आधारित असेल. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे ७ फेब्रुवारी २०१६ रोजी होणार असून त्यासाठी देशभरातील ८ ते १० हजार वितरक हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे.
‘उर्जा क्षेत्रात भारतीय उद्योजकांना संधी’
मुंबई : पहिल्या भारत : वायोिमग व्यवसाय व संस्कृती केंद्राची स्थापना पुण्यातील कोरेगाव पार्क येथे करण्यात आली आहे. याचे उद्घाटन नुकतेच अमेरिकेतील वायोिमग राज्याचे गव्हर्नर महामहीम मॅट मेड यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून मुंबई व वायोिमगसाठी शैक्षणिक, व्यवसायिक व सांस्कृतिक संधी नव्याने उपलब्ध होणार आहे. या समारंभासाठी भावूक त्रिपाठी, भारतीय जनता पक्षाचे आमदार श्रीकांत जोशी व डॉ. शेशाद्री चारी उपस्थित होते. भारत व अमेरिका या दोन देशांमधील असणाऱ्या विविध कला, तंत्रज्ञान, व्यवसाय, पर्यटन यांना अधिक वाव मिळवून देण्यासाठी भावूक त्रिपाठी व त्यांच्याशी संलग्न असलेल्या इतर संस्था व ‘द वायोिमग स्टेट आणि विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो-वायोिमग व्यवसाय व सांस्कृतिक केंद्राची भारतात चार ठिकाणी स्थापना करण्यात येणार असून त्यापकी पहिल्या केंद्राची स्थापना पुण्यातील कोरेगाव पार्क येथे करण्यात आली आहे. वायोिमग राज्याचे गव्हर्नर मॅट मेट म्हणाले की, भारतातील व्यवसायिकांना वायोमिंगमध्ये शेती, उर्जा क्षेत्र, भौतिक विज्ञान या क्षेत्रात वायोिमग मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकतात.
अर्कानुम्झ टरप्रायझेसचे ’डायरेक्ट नेता’अ‍ॅप
मुंबई : अर्कानुम्झ एंटरप्रायजेसने पहिल्या डायरेक्टनेता या राजकीय मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले असून राजकीय नेते आणि त्यांच्या मतदारसंघामधील दरी भरून काढण्यास हे अ‍ॅप मदत करेल, असा विश्वास यानमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.
पंकज सावर्डेकर आणि प्रवीण रमेश काळे या संस्थापकांनी या अ‍ॅपची रचना पोहोचण्यास कठीण असलेल्या राजकारण्यांसोबत थेट फोन कॉल आणि मेसेजेसच्या माध्यमातून जोडले जाण्यासाठी केली आहे. या अ‍ॅपच्या मदतीने सामान्य माणूस पोहोचण्यास कठीण असलेल्या नेत्यांपर्यंत जास्त कार्यक्षमतेने पोहोचू शकतो आणि आपल्या समस्यांकडे तात्काळ लक्ष वेधून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, असे नमूद करण्यात आले. एखाद्या समस्येवर काम सुरू असताना त्याला नियमित ‘अपडेट्स’ही याद्वारे मिळत राहतील.