जागतिक स्तरावर भारतात कॉल ड्रॉप समस्येचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अलीकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने स्वीकार्य कॉल ड्रॉप २.० टक्के निर्धारित केले आहे. तर कॉल ड्रॉपचे जगातील सर्व साधारण प्रमाण ३ टक्क्यांपर्यंत आहे. मात्र या सर्वेक्षणातून भारतातील बहुतेक भागांमध्ये कॉल ड्रॉपचे प्रमाण त्याहून अधिक, ४.७३ टक्के असल्याचे आढळले आहे. हे सर्वेक्षण मोबाइल वापरकर्त्यांना दूरसंचार प्रदात्यांशी जोडणारे डिजिटल स्टार्ट-अप व्यासपीठ ‘रेडमँगो अ‍ॅनालिटिक्स’ने मुंबई, कोलकता, बंगळुरु, जम्मू काश्मीरसह २० शहरांमध्ये केले होते.