नव्या वर्षांत मारुती, ह्य़ुंदाई या कंपन्यांनीही त्यांची विविध वाहने महाग होणार असल्याचे जाहीर केले आहे. यानुसार मारुतीची वाहने १ जानेवारी २०१६ पासून २० हजार रुपयांनी महाग होणार आहेत.

मारुतीची अल्टो ८०० ते एस – क्रॉस अशा प्रत्येकी २.५३ ते १३.७४ लाख रुपये श्रेणीतील विविध वाहने आहेत. ह्य़ुंदाई मोटर इंडियाने तिची विविध वाहने ३० हजार रुपयांनी महाग होणार असल्याचे बुधवारीच स्पष्ट केले. कंपनी ३.१० ते ३०.४१ लाख रुपयांदरम्यान विविध नऊ प्रकारची वाहने तयार करते.
डॉलरसमोर रुपया गेल्याच आठवडय़ात ६७ पर्यंत घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत कमकुवत होणाऱ्या रुपयामुळे उत्पादनांच्या किमती वाढविण्यावाचून पर्याय राहिला नसल्याचे किंमत वाढविणाऱ्या कंपन्यांनी म्हटले आहे.
अलीकडेच सर्वात आधी किंमत वाढीची घोषणा जर्मन बनावटीच्या मर्सिडिज बेन्झने केली आहे. त्या पाठोपाठ बीएमडब्ल्यू, टोयोटा आदी आलिशान कारच्या स्पर्धक कंपन्याही नव्या वर्षांपासून महिन्यात वाहन दरवाढ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.