देशातील कार विक्रीचा प्रवास सलग सहाव्या महिन्यात घसरला असून चालू एप्रिलमधील दुहेरी आकडय़ातील घसरणीने तिने एकूणच चालू आर्थिक वर्षांचे स्वागत केले आहे. एप्रिल २०१३ मधील १,५०,७८९ लाख कार विक्री ही कोणे एके काळी मारुतीसारख्या देशातील पहिल्या क्रमांकाच्या कंपनीची एका महिन्याची संख्या होती.
भारतीय वाहन निर्मिती क्षेत्र वाढत्या इंधनाच्या दरांबरोबर कमी न होत असलेल्या कर्ज व्याजदराचाही गेल्या अनेक महिन्यांपासून सामना करत आहे. त्यातच आगामी कालावधीतही अडखळता प्रवास कायम कायम असल्याचे यंदाच्या सलग सहाव्या महिन्यात रोडावलेल्या कार विक्रीने स्पष्ट केले आहे.
सियाम या वाहन निर्मिती कंपन्यांच्या संघटनेमार्फत शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०१३ मध्ये केवळ सहा कंपन्यांनी वाहन विक्रीतील वाढ नोंदविली आहे. तर तब्बल नऊ कंपन्यांनी नकारात्मक नोंद केली आहे. बिकट परिस्थितीतही वाहन विक्री राखणाऱ्या कंपन्यांमध्ये मारुती, महिंद्र, होन्डा, रेनो यांचा समावेश आहे. तर फोर्ड, ‘ाुंदाई, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्करमध्ये सातत्याने घसरण होत आहे. याच महिन्यात अनेक कंपन्यांनी त्याच्या विविध वाहनांचे दर वाढविले होते. यासाठी कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि वाढत चाललेल विदेशी चलनाचे मूल्य हे कारण देण्यात आले होते.