21 September 2020

News Flash

वाहन विक्रीची पाच वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी!

सरलेल्या २०१५-१६ आर्थिक वर्षांत देशातील प्रवासी कार विक्रीने पाच वर्षांतील सर्वोत्तम वाढ नोंदविली.

| April 9, 2016 03:46 am

२०१५-१६मधील कार विक्री वेग ८ टक्के
सरलेल्या २०१५-१६ आर्थिक वर्षांत देशातील प्रवासी कार विक्रीने पाच वर्षांतील सर्वोत्तम वाढ नोंदविली. या आर्थिक वर्षांत देशांतर्गत प्रवासी कारची विक्री ७.८७ टक्क्य़ांनी वाढली आहे.
गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या महिन्यातील किरकोळ विक्री घसरणीमुळे चालू नव्या आर्थिक वर्षांतील वाहन क्षेत्राच्या प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नव्या आर्थिक वर्षांपासून लागू होत असलेल्या वाहन इंधन अधिभारामुळे आगामी कालावधीत वाहन क्षेत्राचा प्रवास चिंताजनक असेल, अशी भीती व्यक्त केली आहे.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम) ने शुक्रवारी आकडेवारी जाहीर केल्यानुसार २०१५-१६ मध्ये २०,२५,४७९ प्रवासी कारची विक्री भारतात झाली. आधीच्या वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण ७.८७ टक्क्यांनी अधिक आहे. २०१०-११ मधील तब्बल २९.०८ टक्क्यांनंतर ही सर्वाधिक वाढ आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या इंधनावरील पर्यावरण अधिभारामुळे एप्रिलपासून वाहनांच्या किमती ८०,००० रुपयांपर्यंत महाग होणार आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांची वाहने जानेवारी २०१६ पासूनच काही प्रमाणात महाग केली होती.
मार्च २०१६ मध्ये अनेक कंपन्यांनी वाहन विक्रीकरिता सूट – सवलत जाहीर केली होती. शुक्रवारच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानेही अनेक वाहनांवर सवलत होती.
आता हे दोन महत्त्वाचे महिने झाल्यानंतर आगामी प्रवास पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
गेल्या आर्थिक वर्षांत एकूण वाहनांची विक्री ३.७८ टक्क्यांनी वाढत २.०४ कोटींवर गेली आहे. तर दुचाकी क्षेत्राची वाढ ३ टक्क्यांनी उंचावत १.६४ कोटी झाली आहे. त्यात मोटरसायकल विक्री अवघ्या पाव टक्क्याने वाढली आहे.

मार्चमधील विक्री मात्र रोडावली!
मार्च २०१६ मध्ये देशांतर्गत प्रवासी कार विक्री मात्र ०.३० टक्क्यांनी घसरत १,७५,७३० झाली आहे. तर मोटरसायकल विक्री १०.१५ टक्क्यांनी वाढत ९,४६,७५८ झाली आहे. एकूण दुचाकीत १०.९२ टक्के वाढ होऊन ती १४,६७,७१४ नोंदली गेली आहे. व्यापारी वाहने २२.०३ टक्क्यांनी अधिक होत ७९,८६५ झाली आहेत. तर एकूण वाहनांची संख्या गेल्या महिन्यात १०.७६ टक्क्यांनी वाढून १८,५५,६६३ झाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:46 am

Web Title: car sales report in 2015 16
Next Stories
1 तेल दरातील मोठी वाढ चिंताजनक
2 कोल्हापूरमध्ये सहकारी बँकांची दोन दिवसांची परिषद
3 मुथ्थूट फायनान्सची गृह विमा योजना
Just Now!
X