विद्युत उपकरणेही महाग
विद्युत उपकरणांवरील १२ टक्क्यांचे उत्पादन शुल्क १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेल्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणीदेखील ३१ डिसेंबर २०१४ अखेर संपुष्टात येत आहे. यामुळे १ जानेवारी २०१५ पासून विविध विद्युत उपकरणांच्याही किमती वाढणार आहेत. बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विद्युत उपकरणांवरील उत्पादन शुल्कातील कपात सवलत सहा महिन्यांसाठी वाढविली होती. २०१५ च्या पहिल्या eco08तिमाहीत या क्षेत्रातील वाढ अपेक्षित असताना वाढीव किमतीचा त्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’चे अध्यक्ष एरिक ब्रिगेन्झा यांनी व्यक्त केली आहे. वाहनांप्रमाणेच विद्युत उपकरणावरील उत्पादन शुल्ककपात सवलत नव्या अर्थसंकल्पापर्यंत कायम राहावी, अशी या उद्योगाचीही अपेक्षा आहे.
फेब्रुवारी २०१४ :
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली.
जून २०१४ :
नव्याने सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने उत्पादन शुल्कातील कपात सवलत डिसेंबर २०१४ पर्यंत विस्तारली.