सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेच्या संचालक मंडळावर अधिकारी वर्गाचे प्रतिनिधी या नात्याने मुख्य व्यवस्थापक आणि सिंडिकेट बँक ऑफिसर्स असोसिएशनचे महासचिव संजय अनंत मांजरेकर यांची नियुक्ती घोषित करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागातर्फे पुढील तीन वर्षांकरिता मांजरेकर यांची नेमणूक जाहीर झाली आहे. १९८३ साली सिंडिकेट बँकेत अधिकारी पदावर रुजू झालेल्या मांजरेकर यांच्याकडे गेली तीन दशके बँकेचे विविध विभाग आणि शाखांमधून काम करण्याचा अनुभव आहे. शिवाय ऑफिसर्स असोसिएशनमध्ये सुरुवातीपासून कार्यरत राहून सध्या महासचिव पदावर ते पोहोचले असून, एआयएनबीओएफ आणि एआयबीओसी या बँक अधिकाऱ्यांच्या प्रमुख संघटनांचे ते कार्यकारी समिती सदस्य आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 24, 2013 1:03 am