05 August 2020

News Flash

‘कोचर यांच्याकडून बोनसची रक्कम वसूल करण्याचे आदेश द्या’

कोचर यांच्या कृतीमुळे बँकेची आणि बँकेच्या भाग भांडवल धारकांची मोठी मानहानी झाली आहे

मुंबई : चंदा कोचर यांची नियुक्ती रद्द केल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने दिलेली बोनसची रक्कम वसूल करण्याची मागणी आयसीआयसीआय बँकेने सोमवारी उच्च न्यायालयात केली.

बँकेने कोचर यांना एप्रिल २००६ ते मार्च २०१८ या दरम्यान दिलेली बोनसची रक्कम वसूल करण्याबाबत दावा दाखल केला आहे. गैरवर्तनाच्या प्रकरणात कर्मचाऱ्याकडून बोनसची रक्कम वसूल करण्याचा बँकेला अधिकार आहे. याच अधिकारात बँकेने कोचर यांच्याविरोधात बोनसची रक्कम वसूल करण्यासाठी दावा केला आहे.

कोचर यांच्या कृतीमुळे बँकेची आणि बँकेच्या भाग भांडवल धारकांची मोठी मानहानी झाली आहे, बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. कोचर यांनी त्यांच्या बडतर्फीच्या निर्णयाला दिलेल्या आव्हानामागेही बँकेचे नुकसान करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही बँकेने प्रतिज्ञापत्रात केला आहे.

व्हिडीओकॉन कर्ज घोटाळ्याप्रकरणात समावेश असल्याचा आरोप झाल्यानंतर कोचर यांनी स्वत:च राजीनामा दिला होता. मात्र नंतर बँकेने त्यांना बडतर्फ केल्याचे जाहीर केले होते. आपण मुदतपूर्व राजीनामा दिला होता आणि बँकेनेही तो स्वीकारला होता. त्यानंतरही आपली हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा करत कोचर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 1:34 am

Web Title: chanda kochhar bonus order recovery amount akp 94
Next Stories
1 रिझर्व्ह बँकेकडे केंद्र सरकार मागणार ४५ हजार कोटी
2 औद्योगिक उत्पादन दरात नोव्हेंबरमध्ये वाढ
3 ‘आर्थिक मंदीवरच सरकारचे लक्ष केंद्रीत हवे’
Just Now!
X