व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्ज प्रकरणात चर्चेत आलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर यांना राष्ट्रपतींकडून होणाऱ्या गौरव सूचीतून बाद करण्यात आले आहे. ‘फिक्की’ या उद्योग संघटनेच्या महिला शाखेतर्फे हा सोहळा येत्या गुरुवारी नवी दिल्लीत होणार आहे. या कार्यक्रमाला त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणूनही आमंत्रित करण्यात आले होते आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोचर यांचा सन्मान केला जाणार होता. तथापि हा सोहळा यथोचित पार पडेल; मात्र त्यात कोचर यांचा सहभाग नसेल, असे संघटनेच्या कार्यकारी संचालक रश्मी सरिता यांनी स्पष्ट केले.