हल्ली उपलब्ध असलेल्या अनेक आरोग्य विमा योजनांमधून योग्य आरोग्य योजनेची निवड करणे सोपे नाही.
हल्ली ज्याप्रकारचे तणावपूर्ण जीवन जगत आहोत ते पाहता आणि सातत्याने वाढणारा आरोग्यसेवांचा खर्च जो मध्यमवर्गीय आणि गरिब लोकांसाठी चिंतेची बाब बनली आहे, ते पाहता आरोग्य विम्याची गरज नाकारून चालणार नाही.
आरोग्य योजनेची निवड करताना माहितीपूर्ण निर्णय घेतला पाहिजे/ त्यामुळे पुरेसे संरक्षण मिळेल आणि त्याचवेळी खिशाला खूप मोठा भारही सोसावा लागणार नाही. यामुळे करबचतीसाठी देखील मदत होऊ शकते.
विमा योजनेची निवड करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्यसेवेच्या गरजा काय आहेत, किती संरक्षण हवे आहे, तातडीने किती पशाची गरज असेल वगरे.
सोप्या भाषेत सांगायचे तर, आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत :
विमा रकमेची मर्यादा
आरोग्य विम्यात मुख्य मर्यादा असते ती ‘विमा रकमेची’. विमा रकमेपेक्षा अधिक केलेला कोणताही खर्च परत मिळत नाही. लवकरच्या वयापासून पुरेसे संरक्षण घेण्याचा सल्ला दिला जातो. खास करून दावा केल्यानंतर किंवा वय झाल्यावर विमा रकमेत वाढ करता येत नाही.
व्यक्तिगत/फ्लोटर पर्याय
बहुतेक ग्राहकांना अनेक वेळा, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी व्यक्तिगत पॉलिसी विकत घ्यावी की कुटुंबासाठी ‘फ्लोटर पॉलिसी’ घ्यावी याचा निर्णय घेताना खूप विचार करावा लागतो. ‘फॅमिली फ्लोटर’ योजनेत कुटुंबातील सदस्यांमध्ये एक गट म्हणून एकुण विम्याच्या संरक्षणाचा उपयोग करण्याची लवचिकता मिळते.  ‘फॅमिली फ्लोटर’ संरक्षण घेतलेत तर एकाच वर्षांत तुमच्या कुटुंबातील दोन सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, अशा परिस्थितीचा विचार करून पुरेशी उच्च विमा रक्कम घ्यावी.
संरक्षणाचे प्रमाण
सर्वसमावेशक संरक्षणासाठी पसे भरतो तेव्हा जवळजवळ सर्व जोखमी त्यात समाविष्ट असतील याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. विम्याची योजना निवडताना प्रिमियमची रक्कम विरुद्ध मिळणारे फायदे यांची तुलना करावी. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वी आणि नंतर, दिवस सेवा पद्धती, ओपीडी संरक्षण, प्रसुती विस्तार किंवा रुग्णवाहिका सेवा यासारख्या फायद्यांचा देखील विचार करावा.
अनेक व्यक्तींना आरोग्य विमा पॉलिसीसाठी अर्ज करण्यापुर्वी किंवा नव्या आरोग्य योजनेत नोंदणी करण्यापुर्वीच काही आरोग्याच्या समस्या असतात. मुळात असलेल्या स्थितीसाठी वाट पाहणी कालावधी लावला जातो आणि विम्याच्या रकमेव्यतिरिक्त मुळातील आजार समाविष्ट करण्यासाठी पॉलिसीत नमूद करण्यात आलेल्या वाट पाहणी कालावधीची देखील तुलना करून पाहिली पाहिजे. प्रत्येक पॉलिसीचा वाट पाहणी कालावधी वेगवेगळा असतो आणि वेगवेगळ्या स्थितीसाठी तो वेगवेगळा असू शकतो.
उपमर्यादा आणि सहभरणा
विमा संरक्षण असलेल्या रुग्णाला रूग्णालय लावत असलेले फुगीर शुल्क टाळण्यासाठी काही पॉलिसीजमध्ये खोलीचे भाडे किंवा ठराविक पद्धती यासाठी उपमर्यादा असतात आणि आरोग्य विमा पॉलिसीचे मूल्यमापन करताना हे अतिशय महत्त्वाचे ठरते. खासकरून,  यामध्ये दोन प्रकारच्या मर्यादा असतात. एक म्हणजे रुग्णालयाच्या खोलीचे भाडे आणि दुसरे खास रोगासाठी दायित्व. मुख्यत्वे खोलीच्या भाडय़ाला एका दिवसासाठी हमी रकमेच्या १% मर्यादा असते तर आयसीयू शुल्काला हमी रकमेच्या २% इतकी मर्यादा असते.
दुसरा तपासून पाहण्याचा मुद्दा सहभरणा हो. यात विमा कंपनीला दाव्याच्या रकमेच्या किंवा वजावटीच्या ठराविक टक्के रक्कम अगोदर भरण्यास सांगण्यात येते. ज्यात विमा कंपनीची ठराविक खर्चाची मर्यादा असेल जी विमाधारकाला सोसावी लागते आणि जेव्हा या ठराविक मर्यादेपेक्षा जास्त खर्च होतो तेव्हा विमा कंपनीची भूमिका सुरू होते.
उदा. सहभरणा, खोलीच्या भाडय़ावरील मर्यादा आणि उपचारांशी संबंधित मर्यादा. हे थोडे अधिक शुल्क आकारण्याची शक्यता आहे; परंतु आणीबाणीच्या प्रसंगी आíथक जोखीम टाळण्याची शक्यता आहे.
जगभरात वैद्यकीय खर्चात प्रचंड वाढ होत असताना आणीबाणीच्या प्रसंगी चिंतामुक्त राहण्यासाठी तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसीची मदत होऊ शकते आणि त्याचबरोबर चांगल्या प्रमाणात करलाभ मिळू शकतो. प्रथमदर्शनी सर्व पॉलिसी सारख्याच दिसू शकतात आणि त्यामुळे अनेक छोटे छोटे मुद्दे वाचणे महत्त्वाचे असते. दावा करताना येणारा वाईट अनुभव टाळण्यासाठी पॉलिसीचे वगळण्याचे मुद्दे वाचणे देखील महत्त्वाचे असते. मान्यवर विमा कंपनीकडून विमा खरेदी करणे नेहमीच योग्य असते ज्यांचे सेवा देण्याचे आणि दावा निराकरणाचे दस्तावेज करणे चांगले आहे व त्याचबरोबर त्यांचे रुग्णालयाचे जाळे विस्तृत आहे. कारण जेव्हा दावा करण्यासाठी जातो तेव्हा हे मुद्दे खूप महत्त्वाचे ठरतात.
शेवटी परंतु तितकेच महत्त्वाचे, आपल्याला हे माहित असले पाहिजे की स्वस्तातली पॉलिसी नेहमीच चांगली पॉलिसी नसू शकते. तेव्हा सुज्ञपणे निर्णय घेऊन धारकाने स्वत:साठी अगदी योग्य असलेले संरक्षण घ्यावे.

स्वस्तातली पॉलिसी नेहमीच चांगली पॉलिसी नसू शकते. सुज्ञपणे निर्णय घेऊन धारकाने स्वत:साठी अगदी योग्य असलेले संरक्षण घ्यावे. मान्यवर विमा कंपनीकडून विमा खरेदी करणे नेहमीच योग्य असते ज्यांचे सेवा देण्याचे आणि दावा निराकरणाचे दस्तावेज करणे चांगले आहे व त्याचबरोबर त्यांचे रुग्णालयाचे जाळे विस्तृत आहे.

लेखक फ्युचर जनराली इंडिया इन्शूरन्स कंपनी लिमिटेडच्या विमा विभागाचे प्रमुख आहेत.