‘तुमची स्वप्नं केवळ तुमची नाहीत’ असे ब्रीदवाक्य असलेल्या राष्ट्रीयीकृत युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या ३० लाख रुपयांपुढील गृहकर्जाच्या व्याजदरात पाव टक्क्यांची कपात २९ नोव्हेंबर २०१२ पासून लागू केली आहे. रु. ३० लाख ते ७५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेच्या नव्या तसेच विद्यमान ‘बदलत्या दर (फ्लोटिंग रेट)’ प्रकारातील ग्राहकांवर यापुढे १०.५० टक्के व्याजाचा दर लागू होईल.
त्याचप्रमाणे ७५ लाख ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाला १०.७५ टक्के व्याजदर लागू होईल. युनियन बँकेने आपल्या शैक्षणिक कर्जावर दीड ते दोन टक्क्यांची कपात लागू केली आहे. रु. ७.५ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर १२.७५ टक्के व्याजदर लागू होईल, तर ७.५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या शैक्षणिक कर्जावर १२.५० टक्के असा सुधारीत व्याजदर लागू होईल.   
स्त्री कर्जदारांना या दरात अतिरिक्त अर्धा टक्क्यांची सवलत मिळेल.