आर्थिक मंदीच्या सावटात असलेल्या आशियातील सर्वोच्च अर्थव्यवस्थेने २०१४ मधील विकास दर कमी करताना तो ७.३ टक्के अभिप्रेत केला आहे. आधीचा अंदाज ७.४ टक्के होता. तोदेखील गेल्या २५ वर्षांतील सर्वात कमी आहे.
२०१४ साठी चीनने सुधारित केलेल्या अंदाजानुसार, या वर्षांत ६३.६१ लाख कोटी युआन (१० लाख कोटी डॉलर) चे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन होण्याचे गृहित आहे. हे प्रमाण ३२.४ अब्ज युआनने कमी आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनातील प्राथमिक उद्योगांचे ९.२ टक्क्य़ांचे प्रमाण मात्र यंदाच्या अंदाजात स्थिर ठेवण्यात आले आहे; त्यात कोणताही बदल अपेक्षित केला नाही.
देशातील राष्ट्रीय सांख्यिकी चमूमार्फत निश्चित केली जाणारी सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबतची आकडेवारी ही तीन टप्प्यावर आधारित असते.
चीनची २०१५ मधील अर्थव्यवस्था सध्या गेल्या २५ वर्षांच्या तळात प्रवास करत आहे. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेले आकडेही १९९० नंतरचे कमी स्तरावरील आहेत. या दरम्यान विकास दर ३.९ टक्के होता.
गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या चिनी भांडवली बाजारात जून मध्यापासून ४० टक्क्य़ांपर्यंत आपटी नोंदली गेली आहे.
देशाने केलेल्या युआन चलनाच्या ४ टक्क्य़ांपर्यंतच्या अवमूल्यनानेही गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर टाकली आहे.