News Flash

चिनी बाजारात निर्देशांक पडझड

देशातील प्रमुख निर्देशांकही पाच टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदवित होते.

प्रातिनिधिक छायाचित्र

दलाल पेढय़ांवरील कारवाईने अस्वस्थता

शांघाय कंपोझिट : ३,४३६.३० (-१९९.२५,-५.४८%)
शेनझेन कंपोझिट : २,१८४.११ (-१४१.५८,-६.०९%)
चिनी भांडवली बाजारात समभागांच्या खरेदी – विक्रीचे व्यवहार करणाऱ्या काही महत्त्वाच्या दलाल पेढय़ांची चौकशी सुरू करण्यात आल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचा परिणाम बाजारातील विविध निर्देशांकात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांचे मूल्य कमालीच्या घसरणीवर झाली. देशातील प्रमुख निर्देशांकही पाच टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदवित होते.
चीनमधील गुसेन सिक्युरिटीज या मोठय़ा दलाल पेढीच्या व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर हेटॉंग सिक्युरिटीजचे व्यवहारही थांबविण्यात आले आहेत. दलाल पेढय़ांमार्फत व्यवहार करताना मूल्य गैरव्यवहार झाल्याचा नियामकाचा दावा आहे.
नियामकाने हस्तक्षेप करूनही गेल्या वर्षभरात १५० टक्क्य़ांपर्यंत वधारणारे प्रमुख चिनी निर्देशांक यंदाच्या जूनमध्ये ४० टक्क्य़ांपर्यंत घसरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 5:55 am

Web Title: china stock market down
टॅग : China
Next Stories
1 तूर्त थांबा आणि वाट पाहा!
2 आशावादी गारूड बाजारावर कायम सेन्सेक्स, निफ्टीत सलग दुसरी वाढ
3 एचएसबीसीचे व्यवसाय आकुंचन
Just Now!
X