चीनची राजधानी बीजिंग येथे प्रदूषण वाढत असल्याने कोळशावरील हानिकारक वीज प्रकल्प बंद करण्यात आले असून त्याच्याजागी वायूवर आधारित प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. वीस वर्षे जुने औष्णिक प्रकल्प राज्य सरकारच्या गोहुआ विद्युत कंपनीचे होते व त्यातील ४४० मेगावॉटचे प्रल्प बंद करण्यात आले आहेत, असे शह आर्थिक नियोजन संस्थेने सांगितले आहे.