आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टिन लागार्ड यांनीही फ्रान्समध्ये तेथील लाचलुचपत विभागाच्या चौकशीपासून अद्याप पिच्छा सोडवू शकला नसल्याची कबुली दिली आहे. त्या फ्रान्सच्या अर्थमंत्री म्हणून कारभार पाहत असताना घेतलेल्या निर्णयाबाबतचे हे प्रकरण आहे. प्रख्यात क्रीडा-साहित्य निर्मितीतील कंपनी अदिदासच्या झालेल्या आतबट्टय़ाच्या विक्री व्यवहारातील दलाल आणि सरकारच्या मालकीची बँक क्रेडिट लायओनाइज् यांच्यातील वादंगातून ते उद्भवले आहे. या प्रकरणी दलाल उद्योगपतीला मिळालेली ४०० दशलक्ष युरोची रक्कम ही लागार्ड यांचे औदार्य तसेच पैसा व सत्तेची अनिष्ट युतीची निदर्शक असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.