आघाडीचे प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळ बनण्याच्या षष्टीने आपले स्थान अधिक बळकट करताना ‘क्लियरटॅक्स’ने नव्या मालिकेतून २० लाख डॉलरची निधी उभारणी केली आहे. अर्थसाहाय्याच्या या मालिकेत सिकोया कॅपिटल आणि फाऊंडर्स फंड एंजल यांच्याद्वारे प्रत्येकी १० लाख डॉलरची गुंतवणूक आली आहे. याबद्दल बोलताना क्लियरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्याधिकारी अर्चित गुप्ता यांनी सांगितले की, आर्थिक तंत्रज्ञानाची सखोल समज असलेल्या जगातील सर्वोच्च साहसी भांडवल गुंतवणूकदारांकडून हा निधी आला आहे. भारतातील आर्थिक जीवन सुलभ करण्याच्या सुरू असलेल्या मोहिमेसाठी तो वापरला जाईल.