21 September 2020

News Flash

आयसीआयसीआय बँकेचा नाणे हस्तांतर मेळावा

सर्वसमावेशकता विभागाचे सर व्यवस्थापक सी. पटनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

आयसीआयसीआय बँकेने गेल्या आठवडय़ात दादरमधील (पश्चिम) शिवाजी पार्क येथे नाणे हस्तांतर मेळावा आयोजित केला होता. भारतीय रिझव्र्ह बँकेच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक सर्वसमावेशकता विभागाचे सर व्यवस्थापक सी. पटनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यंदाच्या मेळाव्यात १,५०० जण सहभागी झाले. १०, ५, २ व १ रुपयांच्या ५ लाख रुपये मूल्यांच्या चलनी नाण्यांची या वेळी देवाण-घेवाण झाल्याची माहिती देण्यात आली. सर्वसामान्यांना स्वीकार्ह खराब व विविध प्रकारच्या चलनी नोटांऐवजी नव्या नोटा व नाणी देण्यासाठी आयसीआयसीआय बँक विशिष्ट काळाने नाणे हस्तांतर मेळावा आयोजित करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 5:29 am

Web Title: coin transfer rally of icici bank
Next Stories
1 बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाची नवीन ई-केवायसी प्रक्रिया
2 नयपुण्यम कौशल्य विकास परिषदेला मुंबईतूनही पाठबळ
3 गिरनार सॉफ्टच्या मुख्य वित्तीय अधिकारीपदी उमेश होरा
Just Now!
X