आíथक नियोजन करणे आवश्यक आहेच; मात्र त्याचा नियमित आढावा घेणे आणि ते नियोजन काटेकोर पाळणे अधिक गरजेचे आहे. आíथक नियोजन कसे केले जाते आणि हे नियोजन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली पायरी..

आज कुणीतरी सावलीमध्ये बसले आहे. कारण बऱ्याच काळापूर्वी कुणीतरी झाड लावले होते.
– वॉरन बफे
जगातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदाराचे हे वाक्य आहे. मात्र निरोगी झाड हवे असेल तर मातीची मशागत करायला हवी, हे सूज्ज्ञ बागायतदाराला समजते. झाडांना पुरेसे पाणी द्यायला हवे, प्रामुख्याने बिया रुजत असताना व त्यांना कोंब फुटत असताना योग्य ती निगा राखायला हवी, तसेच या बिया पोषकांनी समृद्ध अशा जमिनीत पेरायला हव्यात.
आíथक नियोजनाचेही तसेच आहे. आíथक नियोजन जबाबदाऱ्या व पसे कमाविण्याची क्षमता यांवर आधारित असावा, हा त्याचा गाभा आहे. मालमत्तांमध्ये सर्व गुंतवणुकींचा आणि जबाबदाऱ्यांमध्ये आíथक उद्दिष्टांचा समावेश असतो. आíथक उद्दिष्टासाठी आवश्यकता असेल तेव्हा तुमच्याकडे पुरेशी मालमत्ता असेल, याची काळजी घेताना पुरेशी रोकड सुलभता ही जपायला हवी याची काळजी यशस्वी नियोजनात  घेतली जाते.
आíथक उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये असलेली जोखीमही आíथक नियोजनात विचारात घेतली जाते. निवृत्ती किंवा मुलांचे शिक्षण अशा कोणत्याही महत्त्वाच्या उद्दिष्टासाठी, गरज असताना निधी उपलब्ध होईल, याची खात्री करण्यासाठी अधिक पुराणमतवादी मार्ग निवडावा. दुसरे घर यासारख्या उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीचे धोरण थोडेसे आक्रमक करावे. गुंतवणुकीसाठी कालावधी असेल तरीही गुंतवणुकीचे आक्रमक धोरण स्वीकारता येईल. गुंतवणुकीचा कालावधी जसा वाढेल, तशी समभाग गुंतवणुक व त्यातील परताव्याबाबत अंदाज वर्तवण्याजोगी होऊ लागते.
आíथक नियोजनाच्या शेवटी, मालमत्ता विकेद्रीकरणाचे लक्ष्य, बचत दराचे लक्ष्य आणि गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित करावे. हे तीन घटक अतिशय महत्त्वाचे असून ते तुमच्या आíथक नियोजनाचे यश ठरवतात. परंतु, या तीनही उद्दिष्टांविषयी केवळ माहिती असणे पुरेसे नाही. त्यांचा मागोवा घेणे आणि आवश्यक कृती करणे गरजेचे आहे.   गुंतवणुकीनुसार, शिफारस केलेले मालमत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे आहे. लक्ष्य असलेल्या विकेंद्रीकरणानुसार गुंतवणुकीचे पुन:संतूलन केल्यामुळे गुंतवणूक योग्य जोखीम व परतावा या दिशेने जात राहातेच, शिवाय तुम्हाला कमी दराने खरेदी करणे व अधिक दराने विकणे यासाठीही मदत होते.  पुढचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे, बचत. बचतीचा अर्थ म्हणजे, भविष्यात खर्च करता यावेत म्हणून आजच्या खर्चामध्ये काटकसर करणे. जितकी रक्कम तुम्ही बचतीत टाकाल, तितकी जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्याची तुमची तयारी वाढत जाते. आपण जितके लक्ष्य ठेवले आहे, किमान तितकी बचत करणे गरजेचे आहे. हे गरज व क्षमता यावर अवलंबून आहे. ही बचत इच्छित ‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’नुसार हवी.
आíथक नियोजनाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली की तुम्ही योग्य मार्गाने जात असल्याची खात्री करणे महत्त्वाचे ठरते. गुंतवणुकीवर अपेक्षेपेक्षा वेगळा परतावा मिळू शकतो आणि काळानुसार उद्दिष्टे बदलू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीच्या  अपेक्षित मूल्याच्या तुलनेत पोर्टफोलिओच्या मूल्याचा आढावा घ्यायला हवा.  ५ किंवा ७% चे किरकोळ फरक फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत. मात्र त्याचा आढावा घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
सर्वोत्तम पद्धत – नियोजन आणि त्याची वाटचाल याचा नियमित कालावधीने आढावा घेणे इत्यादी. दर सहा महिन्यांनी किंवा किमान दरवर्षी. तुमचा नियोजक किंवा तज्ज्ञांच्या मदतीने आढावा घेतलेला उत्तम आढावा घेतल्याने अनपेक्षित अडथळे किंवा खर्च यावर मात करणे शक्य होते. उद्दिष्टे बदलू शकतात, तुमची संसाधनेही बदलू शकतात. अपेक्षित नसतानाही कदाचित पसे मिळू शकतात. त्यामुळे, जीवनात जेव्हा जेव्हा लक्षणीय बदल होतील तेव्हा आíथक नियोजनाचाही आढावा घ्यायला हवा.
लेखक आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष, (वित्तीय नियोजन व ग्राहकसेवा) आहेत.