08 March 2021

News Flash

प्रतिमा जपण्यासाठी कंपन्यांकडून ‘रेप्युटेशन मॅनेजमेंट’ला पसंती

इंटरनेटद्वारे व्यवसायवृद्धीचे स्वप्न पाहणाऱ्या उद्योजकांना ‘अफवा’नामक शस्त्राने चांगलेच गांजले आहे. अफवांचे पीक आणि हानिकारक नकारात्मक प्रतिक्रिया यांचा फटका अनेक व्यवसायांना बसला आहे.

| June 25, 2014 12:10 pm

इंटरनेटद्वारे व्यवसायवृद्धीचे स्वप्न पाहणाऱ्या उद्योजकांना ‘अफवा’नामक शस्त्राने चांगलेच गांजले आहे. अफवांचे पीक आणि हानिकारक नकारात्मक प्रतिक्रिया यांचा फटका अनेक व्यवसायांना बसला आहे. त्यामुळेच ‘ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजमेंट’ उद्योगांकडे अशा उद्योजकांची पावले आपसूक वळत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
अरेप्युटेशन.को.युके या ऑनलाइन प्रतिमा व्यवस्थापन कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील ६ हजारांहून अधिक लघू व २४० मोठय़ा कंपन्या ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजमेंट सेवेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले आहे. सध्या भारतात ऑनलाइन रेप्युटेशन मॅनेजमेंट सेवा पुरविणाऱ्या ३०० कंपन्या कार्यरत असून त्या बहुतांशी लहान कंपन्यांना सेवा पुरवीत आहेत. या सर्व कंपन्यांची एकूण उलाढाल २०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पुढे आले आहे. आपल्या कंपनीची ऑनलाइन प्रतिमा उत्तम राहावी यासाठी २५ लाखांपासून ते अगदी दीड कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जात आहे, असेही या निरीक्षणात पुढे आले आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या एकूण कंपन्यांपैकी तब्बल ४९ टक्के कंपन्या फेसबुक, गुगल प्लस, लिंकड्इन् यांसारख्या सामाजिक माध्यमांचा व्यवसायाच्या प्रतिमा निर्मितीसाठी वापर करत आहेत, मात्र त्यामुळेच अनेक कंपन्या ऑनलाइन टीकेचे लक्ष्य ठरल्याचे पाहावयास मिळत आहे, असेही या निरीक्षणात पुढे आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 12:10 pm

Web Title: companies like reputation management to protect the image
Next Stories
1 बाजारावर इराकी सावट
2 विकासाला प्रोत्साहनासाठी ‘जीएसटी’ची अंमलबजावणी आवश्यक : जागतिक बँक
3 कोका-कोलाची भारतात ५०० कोटींची गुंतवणूक
Just Now!
X