10 August 2020

News Flash

‘एनएसई’वरील शेअर व्यवहारातही महाराष्ट्र-गुजरात चढाओढ

देशातील सर्वात मोठा शेअर बाजार- एनएसई (राष्ट्रीय शेअर बाजार) मराठी टक्का वाढत असल्याचा प्रत्यय, ताज्या आकडेवारीने दिला आहे

| May 20, 2015 06:31 am

देशातील सर्वात मोठा शेअर बाजार- एनएसई (राष्ट्रीय शेअर बाजार) मराठी टक्का वाढत असल्याचा प्रत्यय, ताज्या आकडेवारीने दिला आहे. तथापि मुंबईसह महाराष्ट्रातून या बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी गुंतवणूक मूल्याच्या प्रमाणात गुजरातचा वरचष्मा राहिला आहे. राज्यातील छोटय़ा गुंतवणूकदारांच्या एनएसईवरील व्यवहारांमध्ये सरलेल्या वर्षभरात ३८ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे, तर गुजराथी गुंतवणूकदारांच्या व्यवहाराच्या मात्रेत ५० टक्क्य़ांची वाढ दिसून आली आहे. 

देशातील या सर्वात मोठय़ा शेअर बाजारात पश्चिम भारतातील महाराष्ट्रासह, गोवा आणि गुजरात या तिन्ही राज्यांतून गुंतवणूकदारांच्या भागीदारीत सर्वाधिक अशी ३२ टक्क्य़ांची वाढ दिसून आली आहे.
एनएसईच्या रोखीने (कॅश) व्यवहार होणाऱ्या बाजारात दर दिवशी होणाऱ्या सरासरी १८,००० कोटींच्या उलाढालीत मात्र महाराष्ट्रातून सर्वाधिक योगदान राहिले आहे. कोलकाता, दिल्ली या अन्य पारंपरिक शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या राज्यांमधून योगदानातही या काळात वाढ झाली आहे. एनएसईवर सध्या सुमारे अडीच कोटी व्यक्तिगत गुंतवणूकदार सक्रिय असून, गेल्या वर्षभरात केंद्रात मोदी सरकारच्या स्थापनेने झालेला सत्ताबदल आणि विविध उमद्या १२ कंपन्यांकडून दाखल झालेल्या प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) या कारणांनी छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे.

‘भागविक्री’ प्रस्ताव आणणाऱ्या पाच कंपन्यांची सेबीकडून विचारणा
मुंबई: प्रारंभिक खुली भागविक्री (आयपीओ) प्रक्रियेद्वारे भांडवली बाजारात प्रवेश करू पाहणाऱ्या पाच कंपन्यांना बाजार नियामकाने स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत सेबीने कोणतेही कारण स्पष्ट केले नसले तरी भागविक्री प्रक्रियेबाबत काही शंका उपस्थित झाल्याने तशी विचारणा या पाच कंपन्यांना केल्याचे समजते.
अमर उजाला पब्लिकेशन्स, दिलीप बिल्डकॉन, एस. एच. केळकर अ‍ॅण्ड कंपनी, पेन्नार इंजिनीअर बिल्डिंग सिस्टिम्स आणि सिन्जेन इंटरनॅशनल या त्या पाच कंपन्या आहेत. या कंपन्यांना प्रारंभिक खुली भागविक्रीबाबत स्पष्टीकरण मागण्यात आल्याचे समजते. याबाबतची अधिक माहिती २५ मेपर्यंत सेबी आपल्या संकेतस्थळावरून स्पष्ट करेल, असेही नियामकाने नमूद केले आहे.
प्रारंभिक खुल्या विक्रीसाठी सादर करावयाच्या माहितीबाबत महिन्याभराच्या आत उत्तर देण्यास संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापकांना सांगण्यात आले आहे. आलेल्या स्पष्टीकरणाबाबत समाधान झाल्यास सेबी पुढील कारवाई करणार नाही. अन्यथा या कंपन्यांची भागविक्री प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2015 6:31 am

Web Title: competition between marathi and gujarati in nse trade
टॅग Business News
Next Stories
1 १,०१० रुपयांत ‘स्पाइसजेट’चे विमानाचे तिकीट
2 मोदी सरकारकडून जनतेच्या अवास्तव अपेक्षा- रघुराम राजन
3 विदेश प्रवास नोंदीसाठी सवलत?
Just Now!
X