अर्थस्थितीवरून समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या तर्कवितर्काबाबत अभ्युदय बँकेने ठेवीदारांना संयमाचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या सहकारी बँकेच्या अर्थस्थितीबाबत चिंतेचे कारण नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे. देशातील आघाडीच्या सहकारी बँकेने याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रारही दाखल केली आहे.

सहकारी बँकांबाबत समाजमाध्यमांतून काही दिवसांपासून चुकीचे संदेश पसरविले जात आहेत. सहकारी बँकांची आर्थिक स्थिती नाजूक असून बँके तील रकमेबाबत भाष्य समाजमाध्यमांतून भाष्य केले जात आहे. बँके च्या ठेवीदार, खातेदारांनी अशा अप्रचाराकडे दुर्लक्ष करावे. बँके तील ठेवी सुरक्षित आहेत, असेही नमूद करण्यात आले आहे. अभ्युदय बँके प्रमाणेच एनके जीएसबी बँकेलाही या आव्हानाचा सामना करावा लागत आहे.

अभ्युदय बँकेने नमूद केले की, १९६४ पासून कार्यरत बँकेच्या तीन राज्यांतील १११ शाखांमधून व्यवहार सुरू आहेत. बँके चे भांडवल पर्याप्तता प्रमाण रिझव्‍‌र्ह बँके ने आखून दिलेल्या निकषांपेक्षा अधिक आहे. बँके बाबत काही उपद्रवी व्यक्ती नाहक खोटी माहिती पसवत असून याबाबतची तक्रार बँकेने पोलिसांमध्ये केली आहे.

देशातील अग्रगण्य सहकारी बँकांमध्ये गणना होणाऱ्या अभ्युदय बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून बँकेबाबतच्या तथ्यहिन अफवांवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन दि महाराष्ट स्टेट को-ऑप बँक असोसिएशनने केले आहे. अभ्युदय बँक सहकारी संस्थांच्या शिखर संस्थेची एक सभासद आहे.

एनके जीएसबी बँकेने याबाबत म्हटले आहे की, बँकेला १०३ वर्षांचा वारसा असून बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. बहुराज्यीय शेडय़ुल्ड बँके च्या समाजमाध्यमांतून पसरविल्या जाणाऱ्या संदेशांबाबत दखल घेण्यात आली असून संबंधित संदेश हे बिनबुडाचे आहेत. याबाबत बँकेने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रारही केल्याचे बँकेने स्पष्ट केले.