News Flash

सेंट्रल बँक ऑफ इंडियाला तिमाही निकालांबाबत दिलासा

२०१०-२०१२ च्या संपूर्ण आर्थिक वर्षांत निव्वळ नफा २०.८४ टक्कय़ांनी घसरून ८८७.५८ कोटी रुपये झाला

मुंबई : सरकारी मालकीच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत निव्वळ तोटा कमी करत तो १,३४९ .२ .२१ कोटी रुपयांवर आणला आहे. मागील आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत बँकेला १,५२९.०७ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

२०१०-२०१२ च्या संपूर्ण आर्थिक वर्षांत निव्वळ नफा २०.८४ टक्कय़ांनी घसरून ८८७.५८ कोटी रुपये झाला, अशी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सोमवारी वित्तीय निष्कर्ष जाहीर करताना दिली.

गेल्या तिमाहीत बँकेचे उत्पन्न काही प्रमाणात घसरून ५,७७९.८४ कोटी रुपयांवर आले. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ते ६,७२३.७३ कोटी रुपये होते. बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत यंदा सुधारणा झाली आहे. मार्च २०२१ अखेरच्या एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाणात (एनपीए) घसरण होऊन ते १६.५५ टक्के झाले आहे. मागील वर्षांच्या याच कालावधीत ते १८.९२ टक्के होता. सकल अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २९,२७६.९६ कोटी रुपयांवर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 3:10 am

Web Title: consolation to central bank of india on quarterly results ssh 93
Next Stories
1 यंदाही व्याजदर स्थिरच!
2 भारताच्या सागरी खाद्यान्न निर्यातीला फटका
3 प्रमुख निर्देशांकांची विक्रमापासून माघार
Just Now!
X