25 November 2020

News Flash

‘करोना कवच’च्या मुदत काळात लवकरच वाढ!

विमा योजनांचा मुदत कालावधी वाढविण्याचा विचार

(संग्रहित छायाचित्र)

 

विमा क्षेत्राची नियामक असलेल्या ‘आयआरडीएआय’ने करोना प्रतिबंधक लस येण्याला अद्याप खूप अवधी असल्याचे लक्षात घेऊन, कोविड-१९ आजाराशी निगडित विमा योजनांचा मुदत कालावधी वाढविण्याचा विचार सुरू असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.

करोना आजारसाथीवरील उपचाराशी निगडित ‘करोना कवच’ नावाच्या प्रमाणित पॉलिसीची रचना केली जाऊन, ती सामान्य विमा तसेच आरोग्य विमा कंपन्यांकडून १० जुलैपासून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. त्याच धर्तीच्या पॉलिसीधारकांना समजण्यास सोप्या जातील अशा विमा पॉलिसी विशिष्ट मानकांच्या आधारे आणल्या जाव्यात, या संबंधानेही विचार केला जात असल्याचे ‘आयआरडीएआय’चे अध्यक्ष सुभाष सी खुंटिया यांनी स्पष्ट केले. ते ‘सीआआय’द्वारे आयोजित विमा व पेन्शनविषयक वेवपरिषदेत बोलत होते.

करोना प्रतिबंधक लस ही वर्षअखेपर्यंत विकसित होऊन लोकांपर्यंत पोहचेल असे गृहित धरून, ‘करोना कवच’ या पॉलिसीचा मुदत कालावधी हा साडे तीन महिने ते साडे नऊ महिने या दरम्यान ठेवण्यात आला आहे. लवकर दृष्टिक्षेपात नसलेली लस आणि साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कमाल विमित रक्कम पाच लाख रुपये असलेल्या या पॉलिसीचा मुदत कालावधी समर्पक प्रमाणात वाढविण्यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे खुंटिया यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:23 am

Web Title: corona cover term to be extended soon abn 97
Next Stories
1 वैयक्तिक दिवाळखोरीच्या नामुष्कीपासून अनिल अंबानी यांना दिलासा
2 ‘सेन्सेक्स’ची गटांगळी!
3 ‘महाबँके’कडून स्थापनादिनी क्रेडिट कार्ड, सुधारित संकेतस्थळाचे अनावरण
Just Now!
X