करोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. देशातील ३० जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन असल्यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या.

बँकेतील बचत खात्यातील किमान बॅलन्सवर आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा त्यांनी केली तसेच डेबिट कार्ड धारक पुढचे तीन महिने दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.

दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही ही महत्वाची घोषणा त्यांनी केली. यापूर्वी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास शुल्क आकारले जात होते.