28 November 2020

News Flash

करोनाचे वित्तधक्के २०२५ पर्यंत?

‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’ला धास्ती

(संग्रहित छायाचित्र)

 

करोना-टाळेबंदीमुळे दशकाच्या सुरुवातीलाच दुहेरी अंकातील उणे विकास दराला सामोरे जावे लागलेल्या विकसनशील भारतीय अर्थव्यवस्थेवर वैश्विक साथीचे दूरगामी परिणाम २०२५ पर्यंत राहतील, अशी भीती ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’ने व्यक्त केली आहे.

पृथ्वीवरून करोना साथीचे उच्चाटन झाले तरी त्याचे जगातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होणाऱ्या देशांपैकी भारत हा एक महत्त्वाचा देश ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. करोनापूर्व स्तरापासून १२ टक्क्य़ांखाली देशाचे निर्मिती क्षेत्र राहणार असून चालू दशकाच्या मध्यापर्यंत ही स्थिती असेल, असेही म्हटले आहे.

भारत ऐतिहासिक तांत्रिक आर्थिक मंदीच्या दिशेने प्रवास करत असल्याची धास्ती रिझव्‍‌र्ह बँकेच्या गेल्याच आठवडय़ातील अहवालात व्यक्त करण्यात आली होती.

मार्च २०२१ अखेरच्या  वित्त वर्षांत भारताचा अर्थविकास १०.३ टक्क्य़ांपर्यंत आक्रसेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. टाळेबंदीने अर्थव्यवस्था पक्षाघातावस्थेत असून त्यात सुधार येण्यास अवधी लागेल, असेही म्हटले आहे.

कंपन्यांचा कर्जभाराचा ताळेबंद, बँकांचे वाढते अनुत्पादित मालमत्तांचे प्रमाण यासारख्या समस्यांचा भारत यापूर्वीपासून सामना करत आहे.

– प्रियांका किशोर, ‘ऑक्सफर्ड’च्या दक्षिण आशिया व दक्षिणपूर्व आशियाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:15 am

Web Title: corona finances by 2025 abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 जुने iPhone स्लो करणं Apple ला पडलं महागात; भरावा लागणार ११३ दशलक्ष डॉलर्सचा दंड
2 सेन्सेक्स ४४ हजार पार
3 भारत पेट्रोलियमसाठी ‘वेदान्त’कडून स्वारस्य
Just Now!
X